Rohit Sharm and Virat Kohli (Photo Credit - X)

भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) हे 2025-26 साठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) केंद्रीय करार यादीत (BCCI Central Contract List) त्यांचे ए ग्रेड कायम ठेवणार आहेत तर श्रेयस अय्यर, पुनरागमन करणार आहे. श्रेयस अय्यरला गेल्या वेळी देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनुपस्थित राहिल्यामुळे यादीतून वगळण्यात आले होते. परिणामी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी 20 आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही त्यांना 7 कोटी रुपये मिळतील. टी-20 विश्वचषक जिंकून भारताने आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवल्यानंतर रोहित आणि विराटने या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. IPL Points Table 2025: कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करून मुंबई इंडियन्सने नोंदवला पहिला विजय, अपडेटेड पॉइंट्स टेबल येथे पहा

टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही रोहित आणि विराट यांना ए ग्रेड सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट कायम ठेवण्यात आले आहे. ते मोठे खेळाडू आहेत आणि त्यांना योग्य तो आदर मिळावा हा यामचा उद्देश आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीतून वगळण्यात आले होते. त्यानंतर, श्रेयस अय्यरने स्थानिक सर्किटमध्ये परिश्रम घेत उत्कृष्ट फॉर्म दाखवला. मागील रणजी ट्रॉफी सामन्यात, श्रेयसने मुंबईसाठी पाच सामन्यांमध्ये 68.78 च्या सरासरीने आणि 90.22 च्या स्ट्राईक रेटने 480 धावा केल्या. श्रेयसने नऊ सामन्यांमध्ये 345 धावा केल्या. तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये चौथ्या क्रमांकावर होता.

विजय हजारे ट्रॉफीमध्येही श्रेयस अय्यरने आपला उत्तम फॉर्म दाखवला आणि पाच सामन्यांमध्ये 325 धावा केल्या. तो फेब्रुवारीमध्ये भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाचा भाग होता आणि पाच सामन्यांमध्ये 243 धावा करून स्पर्धेत देशाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. अशाप्रकारे, त्याला एक करार देखील मिळणार आहे. तथापि, इशान किशनला वाट पहावी लागू शकते. केंद्रिय करार यादीत त्याच्या नावाचा उल्लेख नाही.