Buldhana Accident: शेगाव-खामगाव महामार्गावर दोन बस आणि बलेरो ची धडक; 5 जणांचा मृत्यू

.पुण्यातून परतवाडा येथे जाणार्‍या एसटी बसला चारचाकी वाहनाने मागून धडक दिली नंतर खाजगी ट्रव्हलसने दोन्ही वाहनांना उडवलं.

Buldhana Accident: शेगाव-खामगाव महामार्गावर दोन बस आणि बलेरो ची धडक; 5 जणांचा मृत्यू
Bus Accident | X@VivekGupta

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर एक विचित्र अपघात झाला आहे. खाजगी बस, एसटी आणि बोलेरो या  तीन वाहनांची एकमेकांना धडक बसली आहे. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत.पुण्यातून परतवाडा येथे जाणार्‍या एसटी बसला चारचाकी वाहनाने मागून धडक दिली नंतर खाजगी ट्रव्हलसने दोन्ही वाहनांना उडवलं. भरधाव बोलेरो शेगावकडून  कोल्हापूरकडे जात होती. सध्या जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून पोलिस प्रशासनाकडून या दुर्घटनेची माहिती घेतली जात आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 02, 2025 08:29 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).