सुनील गावस्कर, अमिताभ बच्चन (Photo Credit: IANS)

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार सुनील गावस्कर यांनी मेगास्टार अमिताभ बच्चन यांचे अनुकरण करत टीम इंडियाच्या फलंदाजीतिल सर्वात कमकुवत बाजूबद्दल मजेदार टिपण्णी केली. बंगळुरु येथे सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौर्‍याच्या तिसऱ्या टी-20 मॅचदरम्यान गावस्करने टीम इंडियाच्या चौथ्या क्रमांकावरील फलंदाजीची मजेदार पद्धतीने टीका केली. गावस्कर, हर्षा भोगले याच्यासह या मॅचमध्ये भाष्य करत गावस्कर यांनी प्रसिद्ध भारतीय टेलीव्हिजन गेम शो 'कौन बनेगा करोडपती'च्या स्टाईलमध्ये टीम इंडिया आणि सर्व चाहत्यांना खुपसणारा चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजासंदर्भात प्रश्न विचारला. (IND vs SA 3rd T20I: Female फॅनने म्हटले 'I Love You' तर रिषभ पंत ने दिले असे रिअक्शन)

झाले असे की, प्रसारकने टीव्ही स्क्रीनवर केबीसीच्या स्वरुपाप्रमाणे चार पर्याय देत टीम इंडियात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास कोण उपयुक्त असेल असा प्रश्न प्रदर्शित केला. विकेटकीपर फलंदाज रिषभ पंत सध्या दिलेल्या स्थानावर फलंदाजी करीत आहेत, तर अन्य तीन पर्याय होते- श्रेयस अय्यर, मनीष पांडे आणि के एल राहुल. गावस्करनंतर भोगलेदेखील या मजेत सहभागी झाले. भोगलेनीं बच्चन यांची नक्कलदेखील केली. गावस्कर म्हणाले की, भारताच्या चौथ्या क्रमांकाचा प्रश्न कौन बनेगा करोडपती पातळीवरील प्रश्न आहे. पहा हा मजेदार व्हिडिओ: 

विनोदा बाहेर विचार केला तर, टीम इंडियाची मधली फळी फार कमकुवत आहे. याचमुळे भारतीय संघाला विश्वचषकमध्ये पराभव पत्करावा लागला होता. सध्या, चौथ्या क्रमांकावर पंतला फलंदाजीसाठी पाठवले जात आहे. पण, त्याने या क्रमांकावर फलंदाजी करत कोणताही प्रभाव पडला नाही. तर, श्रेयसने मिळालेल्या संधीचे सोनं केलं आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यापासून श्रेयसने त्याची कामगिरी उंचावली. आणि प्रभाव पडत स्वतःला त्या स्थानासाठी प्रबळ दावेदार म्हणून सिद्ध केले आहेत.