दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या मॅचसाठी भारतीय क्रिकेट संघ बंगळुरुमध्ये आहे. युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) ने संघासमवेत या सामन्यापूर्वी प्रशिक्षण सत्रात बराच सराव केला. मोहाली टी-20 त्याच्यासाठी चांगला राहिला नाही आणि तो 5 चेंडूत 4 धावांवर बाद झाला. त्याच्या बाद होण्याच्या तंत्रावर चाहते आणि विशेषज्ञाकडून बरेच प्रश्न उपस्थित झाले होते. अशा परिस्थितीत टीम इंडियामधील त्याच्या जागेवर धोका निर्माण झाला आहे. असे असूनही चाहत्यांमध्ये त्याची आवड कमी झाली नाही. आणि आता तो बेंगळुरूच्या एम चिनास्वामी स्टेडियमवर होणार्या तिसर्या टी-20 मॅचपूर्वी अनेक चाहते पंतचा ऑटोग्राफ घेण्यासाठी आले होते. (Ind Vs SA 3rd T20 Match: रिषभ पंत याच्या अडचणी वाढल्या; भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यातील तिसरा टी-20 सामना ठरु शकतो अखेरचा)
चिन्नास्वामीच्या मॅचआधी सराव सत्रादरम्यान अनेक युवा चाहतेदेखील उपस्थित होते. यादरम्यान, एका मुलीने पंतला असे काही सांगितले की भारतीय संघाचा हा युवा यष्टिरक्षक-फलंदाज लज्जित झाला. पंत चाहत्यांना ऑटोग्राफ देत होता आणि यावेळी एका मुलीने पंतकडे प्रेम व्यक्त केले. तिला लव्ह यू रिषभ' असे म्हणताना ऐकले गेले. हे ऐकून पंत पहिले तर आश्चर्यचकित झाला आणि नंतर त्यालाच लाज वाटली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला गेला आहे. व्हिडिओ शेअर करताना एका यूजरने कॅप्शन देत लिहिले की, 'मी त्याच्यावर प्रेम करते हे किमान रिषभ पंतला माहित आहे. ओएमजी, शेवटी तो कसा लाजला ते तरी पहा"
Atleast @RishabhPant17 knows I love him😂 omg look at how he blushed in the end😭😂 #RishabhPant pic.twitter.com/9ktmY87r4D
— Salvi (@salvipatell) September 21, 2019
दुसरीकडे, वनडे आणि टी-20 मध्ये रिषभची कामगिरी अपेक्षेनुसार झाली नाही आणि यामुळे त्याच्या संघातील उपस्थितीवर अनेक प्रश्नदेखील उपस्थित केले जात आहेत. पण, टेस्ट संघात त्याचे स्थान पक्के झाले आहेत. मागील वर्षी त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि आतापर्यंत त्याने दोन शतके केली आहेत. पण वनडेमध्ये 12 सामने खेळल्यानंतरही त्याच्या नावावर एकही अर्धशतक नाही. टी-20 मध्ये त्याने 19 मॅचमध्ये त्याने दोन अर्धशतके झळकावली आहेत. पण त्याच्या शॉटच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले गेले होते.