IND vs SA 3rd T20I: क्विंटन डी कॉक च्या तुफानी खेळीने टीम इंडिया बॅकफूटवर; 9 विकेट्सने दक्षिण आफ्रिका विजयी, मालिका 1-1 ने ड्रॉ
India vs South Africa ICC World Cup 2019 (Photo Credits: Getty Images)

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) संघातील तिसऱ्या  मॅचमध्ये विजय मिळवत दक्षिण आफ्रिकाने 9 विकेट्स राखत विजय मिळवला. या विजयासह दोन्ही संघातील तीन सामन्यांची मालिका 1-1 ने ड्रॉ झाली. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळलेल्या निर्णायक मॅचमध्ये आफ्रिकी कर्णधार क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) याने महत्वपूर्ण खेळी केली.  डी कॉकने नाबाद 79 धावा केल्या. डी कॉकचे हे यंदाच्या मालिकेतील दुसरे अर्धशतक होते. डी कॉक 52 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारांसह 79 धावांवर नाबाद राहिला. तर, तिसऱ्या क्रमांकावरील टेम्बा बावुमा (Timba Bavuma) 23 चेंडूत 27 धावा करून नाबाद राहिला. (IND vs SA 3rd T20I: अमिताभ बच्चन चे अनुकरण करत सुनील गावस्कर नी KBC स्टाईलमध्ये विचारला टीम इंडियाच्या चौथ्या क्रमांकरील फलंदाजावरील प्रश्न, Video)

या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने टॉस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आणि अशाप्रकारे टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 9 गडी गमावून 134 धावा केल्या. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 135 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 16.5 ओव्हरमध्ये 1 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार डिकॉकने शानदार 79 धावा फटकावल्या. 135 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पॉवरप्लेच्या 6 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता 43 धावा केल्या. कर्णधार डी कॉक आणि रीजा हेंड्रिक्स (Reeza Hendricks) यांनी संघाला चांगली सुरुवात दिली. 11 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर भारताला पहिला विकेट मिळाला, जेव्हा हेंड्रिक्स 28 धावा करत हार्दिक पंड्या याच्या चेंडूवर कोहलीच्या हाती झेलबाद हाल. यानंतर कोहलीने देखील दुखापतीमुळे मैदान सोडले आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) याने संघाचे नेतृत्व सांभाळले.

दुसरीकडे, भारतीय संघाने आज निराशाजनक प्रदर्शन केले. तिसर्‍या टी-20 सामन्यातही रोहित चांगली खेळी खेळू शकला नाही. त्याने फक्त 9 धावा केल्या आणि बुरेन हेंड्रिक्स याच्या गालंदाजीवर विकेट गमावली. शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्या रूपात भारताला आणखी एक धक्का बसला. 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 25 चेंडूत 36 धावा फाटकावणाऱ्या धवनला बाबुमाच्या हाती तबरेज शमसी याने झेलबाद केले. नंतर, कोहलीच्या रूपात भारताला तिसरा धक्का बसला. 15 चेंडूत 9 धावा करून कोहली कागिसो रबाडा याचा बळी बनला. भारताला चौथा धक्का रिषभ पंत (Rishabh Pant) याच्या रूपात मिळाला, त्याने 20 चेंडूंत 19 धावा केल्या. यंदाच्या मालिकेत पंतचे प्रदर्शन काही समाधान कारक नव्हते. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) ही 5 धावा करुन स्टम्प आऊट झाला. त्याला डि कॉकने बाद केले. सहाव्या विकेटसाठी 4 धावा काढून क्रुणाल पंड्या बुरेन हेन्ड्रिक्स याचा निशाणा बनला. त्यानंतर, हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी संघाचा डाव सावरला. पण, जडेजा 19 आणि हार्दिक 14 धावा करून बाद झाला. हार्दिक आणि जडेजाच्या भागीदारी च्या जोरावर भारताला शंभरी गाठता अली. दक्षिण आफ्रिकेकडून कॅगिसो रबाडाने 3, बोर्न फोर्टिन आणि बुरेन हेंड्रिक्सने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या, तर तबरेज शमसीला एक विकेट मिळाली.

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघाची पुढील भेट आता टेस्ट मालिकेदरम्यान होईल. 2 ऑक्टोबरपासून आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांच्या टेस्ट मालिकेला सुरुवात होईल.