IND vs SA 3rd T20I: दक्षिण आफ्रिका गोलंदाजांनी लोळवलं, टीम इंडियाने दिले 135 धावांचे लक्ष्य
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ (Photo Credit: Getty)

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) संघातील तिसऱ्या आणि अंतिम मॅचमध्ये आफ्रिकी गोलंदाजानी आपले वर्चस्व राखत टीम इंडियाला 9 बाद 134 धावांवर रोखले. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या मॅचमध्ये भारताने आफ्रिका संघाला विजयासाठी 20 ओव्हरमध्ये 135 धावांचे लक्ष्य दिले आहेत. आजच्या मॅचमध्ये एकीकडे भारत विजय मिळवत क्लीन-स्वीप करण्याच्या निर्धारित असेल तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकी संघ मालिका वाचवण्याच्या उद्देशात असेल. भारताने आजवर आफ्रिकाविरुद्ध घरच्या मैदानावर खेळली एकही मालिका जिंकली नाही. आजच्या मॅचमध्ये विजय मिळवत टीम इंडिया इतिहास बदलण्याच्या प्रयत्नात असेल. (IND vs SA 3rd T20I: विराट कोहली पुन्हा एकदा धावांच्या शिखरावर; 'गब्बर' शिखर धवन चा रोहित शर्मा, विराटच्या 'या' यादीत समावेश)

दरम्यान, आजच्या सामन्यात टॉस जिंकून भारताने पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. संघाची सुरुवात चांगली होताना दिसताच सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) 9 धावांवर बाद झाला. रोहित सुरुवातीला आक्रमक दिसत होता. पण, ब्युरन हेन्ड्रिक्स याने त्याला बाद करत संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर, कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मैदानावर आला. मागील सामन्यात विजयी खेळी करणाऱ्या विराटकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण तो देखील काही मोठे शॉट्स मारून कागिसो रबाडा याच्या गोलंदाजीवर सीमारेषेजवळ झेल बाद झाला. त्यानंतर शिखर धवन (Shikhar Dhawan) देखील धावांवर बाद झाला. धवनने 36 धावा केल्या. आघाडीचे तिन्ही फलंदाज माघारी परतल्यावर मधल्याफळीवर धावा करण्याची जबाबदारी आली. पण, त्यांनी निराश केले. रिषभ पंत (Rishabh Pant) याने काही मोठे शॉट्स केलेले पण त्याच्या साथीला आलेल्या श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) जास्त काळ मैदानावर टिकून राहू शकला नाही. श्रेयसने 5 धावा केल्या. त्याच्या मागोमाग पंतदेखील 19 धावांवर बाद झाला. कृणाल पंड्या (Krunal Pandya) देखील काही करू शकला नाही आणि संघर्ष करताना दिसला. कृणाल बाद झाला तेव्हा भारताची धाव संख्या 6 बाद 98 अशी होती.

त्यानंतर, हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी मोठे शॉट्स खेळण्याची जबाबदारी स्वीकारली. टीम इंडियासाठी धवन, पंत आणि जडेजा यांनी सर्वाधिक धावा केल्या. रबाडाने 3 विकेट्स घेतले तर, बोर्न फॉर्चून, हेन्ड्रिक्स यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. रबाडाने विराट, जडेजा आणि हार्दिकला बाद केले. आणि तबरेज़ शम्सी याला 1 विकेट मिळाली.