टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील सुरु असलेल्या दुसरी टेस्टच्या चौथ्या दिवसाच्या लंचची वेळी झाली आहे. तिसऱ्या दिवशी भारताने (India) आफ्रिकेला 275 धावांवर बाद केल्यावर तिसऱ्या दिवशी फॉलोऑन दिला. याच्यानंतर दुसऱ्यांदा फलंदाजीला येत आफ्रिका संघाने लंचपर्यंत 4 बाद 74 धावा केल्या आहेत. आणि भारताला आता विजयासाठी अजून ६ विकेटची आवश्यकता आहे. दुसऱ्यांदा फलंदाजी करताना आफ्रिकेचा सलामीवीर डीन एल्गर (Dean Elgar) 48 धावांवर चांगली फलंदाजी करीत होता, पण रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने त्याला फ्लाइट डिलिव्हरीमध्ये अडकवले आणि उमेश यादव याच्या हाती झेलबाद केले. एल्गर 72 चेंडूंत 8 चौकारांसह 48 धावांवर बाद झाला. कर्णधार फाफ डु प्लीसीस (Faf du Plessis) चांगला खेळत होता, पण अश्विनने त्याला तिसऱ्यांदा बाद केले. (IND vs SA 2nd Test Day 4: दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन देत विराट कोहली याने रचला इतिहास, असे करणारा बनला पहिला भारतीय कर्णधार)
326 धावांनी पिछाडीवर राहिलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला दुसर्या डावात पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर इशांत शर्मा याने एडन मार्कर्म याला पॅव्हिलियनचा मार्ग दाखवला. मार्क्राम शून्यावर बाद झाला. त्यानंतर विकेट पाडण्याचे सत्र सुरूच राहिले. भारतासाठी विकेटकीपर रिद्धिमान साहाने दोन अप्रतिम झेल घेत महत्वपूर्ण विकेट मिळवून दिले. दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात 275 धावांवर बाद करत भारताने 326 धावांची आघाडी मिळवली होती. भारताकडून अश्विनने चार, वेगवान गोलंदाज उमेश यादव याने तीन, मोहम्मद शमी याने दोन आणि रवींद्र जडेजा याने एक गडी बाद केला.
तिसऱ्या दिवशी, फलंदाज केशव महाराज (Keshav Maharaj) आणि वर्नोन फिलेंडर (Vernon Philander) यांनी शानदार फलंदाजी केली. पण, टीम इंडियाच्या बलाढ्य 600 धावांच्या जवळही पोहचू शकले नाही. फिलँडर आणि चोटिल महाराज यांनी नवव्या विकेटसाठी 119 धावांची भागीदारी केली. फिलँडर 44 धावांवर नाबाद राहिला तर महाराजांनी 72 धावा केल्या. दोघांनी सुरेख खेळ केला. दोघे जेव्हा क्रीजवर आले तेव्हा दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या आठ विकेट्सवर 152 अशी होती. अश्विनने भारताकडून 69 धावा देऊन चार बळी घेतले तर रवींद्र जडेजाला एक विकेट मिळाला.