भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात खेळल्या जाणार्या दुसर्या कसोटी सामन्याच्या दुसर्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा संघ संकटात सापडला आहे. दुसर्या दिवसाच्या खेळादरम्यान भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आकर्षण केंद्र होता. विराटने रेकॉर्ड दुहेरी शतक केले आणि रेकॉर्डस्ची लाईन लावली. यानंतर टीम इंडियाने 601 धावांवर पहिला डाव घोषित केला. यानंतर जेव्हा दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी आली तेव्हा त्यांची पहिली विकेट दोन धावांवर पडली. मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांनी आफ्रिकी गोलंदाजांच्या मुश्किलीत वाढ केली. सुरुवातीपासून दोन्ही वेगवान गोलंदाजांनी आपले वर्चस्व बनवून ठेवले होते. दुसऱ्या दिवशी देखील त्यांनी त्यांची शानदार गोलंदाजी कायम ठेवली आणि आफ्रिकी संघाच्या अडचणीत वाढ केली. आणि यात त्यांना साथ दिली ती कर्णधार विराट आणि विकेटकीपर रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha). (IND vs SA 2nd Test Day 3: फाफ डू प्लेसिस याचे संघर्षपूर्ण अर्धशतक, Lunch पर्यंत टीम इंडियाकडे 465 धावांची आघाडी)
तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला, शमीच्या 18 व्या ओव्हरमध्ये चौथ्या स्लिपवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या कोहलीने नाईट वॉचमन एनरिच नॉर्टजे (Anrich Nortje) याला बाद करण्यासाठी शानदार कॅच घेतला. त्यानंतर, साहाने त्याचे एक्रोबॅटिक कौशल्ये दाखवत पहिल्या स्लिपवर फिल्डिंग करत असलेल्या चेतेश्वर पुजारासमोर धमाकेदार कॅच पकडला आणि थेयूनिस डी ब्रूयन (Theunis de Bruyn) याला माघारी धाडले.
Kohli + Saha = Catch special
what a catch from wriddhiman saha ...#saha#ViratKohli#INDvsSA https://t.co/iEzdPsEGUo
— CricInfo (@keralacricinfo) October 12, 2019
तिसऱ्या दिवशीचा लंच ब्रेक घेण्यात आला आहे. लंचपर्यंत आफ्रिकी संघाने त्यांचे 6 विकेट गमावले आणि 136 धावा केल्या होत्या. लंच ब्रेकपर्यंत कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) याने अर्धशतके केले होते. यासह त्याने टेस्ट करिअरमधील 3700 धावांचा टप्पादेखील गाठला. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा भारताच्या वेगवान गोलंदाज, मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांनी आफ्रिकी फलंदाजांवर दबाव आणणे सुरु केलं होते. यापूर्वी, विराटने जोरदार बॅटिंग केली आणि आफ्रिकी गोलंदाजांची शाळाच घेतली. दक्षिण आफ्रिकासाठी कगिसो रबाडा सर्वात यशस्वी राहिला. त्याने 3 विकेट घेतले.