IND vs SA 2nd T20I: टीम इंडियाकडून पराभवानंतर डेल स्टेन याने दिली 'ही' प्रतिक्रिया, पुढील मॅचमध्ये पुनरागमन करण्याचा व्यक्त केला विश्वास
डेल स्टेन (Photo Credits: Getty Images)

मोहालीने खेळलेल्या दुसर्‍या टी-20 सामन्यात भारताने (India) दक्षिण आफ्रिकेला (South Africa) 7 विकेट राखून पराभूत केले. पहिले फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकाने 20 ओव्हरमध्ये 149 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 3 विकेट गमवून 151 धावा केल्या. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने या सामन्यात नाबाद 72 धावांची खेळी केली. विराट व्यतिरिक्त शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांनीही चांगली खेळी खेळून संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली. भारताविरुद्ध पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन (Dale Steyn) याने ट्विटरवर एक खास ट्विट केले आणि संघाच्या पराभवांबाबत प्रतिक्रिया दिली आहे. स्टेनने सोशल मीडियावर लिहिले, विराटच्या सेनाने चांगला धडा शिकविला आहे. (IND vs SA 2nd T20I: रेकॉर्ड तोड खेळीसाठी ICC ने केले विराट कोहली चे कौतुक, शाहिद आफ्रिदी ने केले 'हे' मोठे विधान)

स्टेनने लिहिले, "वेग चांगला आहे, पण हुशार असणे आणि हे कधी आणि कसे वापरावे हे जाणून घेणे चांगले आहे. शिकण्याची उत्तम जागा मैदानात आहे आणि विराट आणि त्याची टीमने आज आम्हाला चांगला धडा शिकवला. पुढच्या मॅचमध्ये दमदार पुनरागमन करा बॉईज!" मॉर्ने मॉर्केल याच्या निवृत्तीनंतर आणि स्टेनच्या घसरत्या फॉर्ममुले दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीची चमक कमी झाली आहे. पण, कगिसो रबाडा (Kagiso Rabada) आणि लुंगी एनगीडी (Lungi Ngidi) यांच्या गोलंदाजांनी त्यांना आश्वस्त केले आहे. पण, अजूनही त्यांना त्यांच्या फॉर्ममध्ये काही बदल करण्याची गरज आहे.

डेल स्टेनच्या दुखापतीमुळे त्याला विश्वचषकमध्ये भाग घेता आले नाही. परिणामे, दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी कमकुवत दिसली. आणि संघाचे आव्हान ग्रुप स्टेजमध्ये संपुष्टात आले. दरम्यान, दक्षिण आफ्रिकाकडे जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक कगिसो रबाडा आहे. पण, मागील मॅचमध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही आणि संघाच्या पराभवाचे हे मोठे कारण होते. त्याने त्याच्या पहिल्या ओव्हरमधील पहिल्या 2 चेंडूत दोन चौकार देऊन टाकले.