IND vs SA 2nd ODI 2022: केएल राहुल रनआउट होता होता थोडक्यात बचावला, Rishabh Pant याची चुक टीम इंडियाला पडली असती महागात (Watch Video)
केएल राहुल आणि रिषभ पंत (Photo Credit: Twitter)

IND vs SA 2nd ODI 2022: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात पार्लच्या बोलंड पार्क येथे दुसरा वनडे सामना सुरु आहे. भारताच्या सुरुवातीला टीम इंडिया (Team India) कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) नाणेफेक जिंकली आणि पहिले फलंदाजीला उतरण्याचा निर्णय घेतला. त्याने अनुभवी सलामीवीर शिखर धवनच्या साथीने सलामीची अर्धशतकी भागीदारी करून आपला निर्णय योग्य ठरवला. पण भारतीय संघाने (Indian Team) धवन पाठोपाठ माजी कर्णधार विराट कोहलीची विकेट गमावल्यावर संघ अडचणीत सापडला. या दोन धुरंधर फलंदाजांनंतर राहुलला साथ देण्यासाठी श्रेयस अय्यरऐवजी दौऱ्यावर टीकेचा सामना करणारा रिषभ पंत (Rishabh Pant) मैदानात उतरला. तथापि पंत सुरुवातीपासूनच यजमान संघावर दडपण आणण्याच्या घाईत दिला. आणि त्याची ही घाई टीम इंडियाला चांगलीच महागात पडली असती. पंतच्या एका चुकीच्या कॉलमुळे राहुल रनआउट होता होता ठोक्यात वाचला. (IND vs SA 2nd ODI 2022 Live Streaming: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या वनडे सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसा पाहणार?)

भारतीय डावातील 16 व्या षटकात ही घटना घडली. दक्षिण आफ्रिकी फिरकीपटू केशव महाराजच्या फिरकी गोलंदाजीवर पंतने बॉलला बॅट दाखवली आणि धाव घेण्यासाठी धावला. दुसऱ्या टोकाला उभ्या राहुलने देखील प्रतिसाद देत पळ घेतली, पण तोवर कर्णधार टेंबा बावुमाने चेंडू रोखला आणि गोलंदाजच्या दिशेने फेकला. यादरम्य राहुलने अर्ध्या वाटेत पोहोचला होता. पंत आपल्याकडे पाहत असलेलया राहुलला परत जाण्याचा इशारा न करताच आपल्या टोकाच्या दिशेने धावला. तथापि बावुमाने फेकलेला चेंडू महाराज योग्यपणे पकडू शकला नाही आणि चेंडू पुढे गेला. अशाप्रकारे राहुलला दुसऱ्या टोकाला जाण्याची संधी मिळाली आणि तो रनआउट होता होता वाचला. महाराजने चेंडू पकडला असता राहुलने पॅव्हिलियनची वाट धरली असती. पण तो चेंडू गोळा करू शकला नाही आणि तो दीप कव्हरकडे गेला. राहुल अजूनही कीपरच्या दिशेला होता, आणि चेंडू स्टंपच्या जवळ नाही हे त्याला जाणवल्यावर त्याने दुसऱ्या दिशेने धाव घेतली.  पंतच्या चुकीच्या कॉलमुळे राहुल देखील संतापलेला दिला आणि क्रीजमध्ये परत गेल्यावर तो युवा फलंदाजांवर चांगलाच चिडला.

तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. धवन 29 तर कोहली शून्यावर बाद झाला. कोहलीने यादरम्यान पाच चेंडू खेळला पण एकही वेळ तो नियंत्रणात दिसला नाही. टीम इंडिया पहिल्या सामन्यातील प्लेइंग इलेव्हन बदल न करता मैदानात उतरली आहे तर यजमान संघात गोलंदाजी अष्टपैलू मार्को जॅनसेनच्या जागी वेगवान गोलंदाज सिसांडा मगालाचा समावेश आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिका 1-0 ने आघाडीवर आहे.