IND vs SA 1st Test Day 3: यजमान दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि भारत (India) यांच्यातील सेंच्युरियन कसोटी (Centurion Test) सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संततच्या पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क (SuperSport Park) क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघात सुरु असलेल्या बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Test) सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी एकही चेंडू टाकला गेला नाही. सकाळपासून हलक्या सरी कोसळत होत्या, मात्र दुपारनंतर पावसाने जोर धरला. दोनदा पाऊस थांबला आणि पंचांनी मैदानाची पाहणी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा दोन्ही वेळा पाहणीच्या वेळेआधीच पावसाने पुन्हा बसरण्यास सुरुवात केली आणि पंचांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द झाल्याची घोषणा केली. दरम्यान दुसऱ्या दिवसाचा खेळ न झाल्यामुळे खेळाडूंसह चाहत्यांची देखील निराशा झाली त्यामुळे आता सर्वांची नजर तिसऱ्या दिवसाच्या खेळावर असेल. सेंच्युरियन (Centurion) येथे सामन्याचा तिसरा दिवस म्हणजे 28 डिसेंबर रोजी हवामानाचा अंदाज खालीलप्रमाणे आहे. (IND vs SA 1st Test Day 2: पावसाची बॅटिंग सुरुच राहिल्याने पहिल्या दिवसाचा खेळ रद्द, एकही चेंडू नाही खेळला गेला)
सेंच्युरियन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पावसाच्या संततधारनंतर तिसऱ्या दिवशीही हवामान स्वच्छ राहण्याची अपेक्षा आहे. हवामान खात्यानुसार मंगळवारी सेंच्युरियनमध्ये पाऊस पडणार नाही. अहवालानुसार सोमवारी रात्रीपर्यंत सेंचुरियनमध्ये जोरदार पाऊस पडेल, परंतु मंगळवारी आकाश साफ असेल आणि पाऊस पडणार नाही. तसेच आणखी पाऊस पडल्यास फलंदाजी करणे कठीण होईल. उद्या मंगळवार, 28 डिसेंबर रोजी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी खेळ त्याच्या नियोजित वेळेवर सुरू होईल आणि तिसऱ्या सत्रात अतिरिक्त अर्धा तास खेळ खेळला जाईल.
दरम्यान, सामन्याबद्दल बोलायचे तर टॉस जिंकून फलंदाजीला उतरलेली टीम इंडियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 3 बाद 272 धावा केल्या होत्या. सलामीवीर केएल राहुल 248 चेंडूत 122 तर अजिंक्य रहाणे 81 चेंडूत 40 धावा खेळत आहे. राहुलने आतापर्यंत आपल्या शतकी खेळीत 17 चौकार आणि एक षटकार तर रहाणेने आठ चौकार मारले आहेत. यांच्याशिवाय सलामीवीर मयंक अग्रवालने 60, कर्णधार विराट कोहलीने 35 धावा केल्या. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने 45 धावांवर तीनही विकेट घेतल्या आहेत.