भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील पहिला टी-20 सामना उच्च स्कोअरिंगचा होता. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने (Team India) निर्धारित 20 षटकात 211 धावांचा डोंगर उभारला तर पाहुण्यांनी 19.1 षटकात 212 धावा करत सामना जिंकला. दरम्यान जर सामना उच्च स्कोअरिंग असेल तर षटकारांचा पाऊस पडेल हे निश्चित आहे. दोन्ही संघांनी मिळून 28 षटकार मारले, ज्यामध्ये दोन्ही संघाच्या खेळाडूंनी 14-14 षटकार मारले. एका सामन्यात जास्त षटकार मारण्याचा विक्रम नक्कीच असेल, पण भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या 7 खेळाडूंनी पहिल्या टी-20 सामन्यात इतिहास रचला. (IND vs SA 1st T20I: टीम इंडियाच्या सलामीच्या वादावर स्टार फलंदाजाची मोठी प्रतिक्रिया, म्हणाला - ‘रोहित शर्मा किंवा केएल राहुलला डावलून सलामीवीर म्हणून...’)
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या या सामन्यात एकूण 7 खेळाडूंनी तीन किंवा त्याहून अधिक षटकार ठोकले. टी-20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असे घडले आहे, याआधी 6 खेळाडूंनी हा पराक्रम केला होता. 2009 मध्ये न्यूझीलंड आणि भारत व् 2021 मध्ये न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यांमध्ये 6 खेळाडूंनी है कारनामा केला होता. दिल्लीत झालेल्या टी-20 सामन्यात ईशान किशन, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी तीन षटकार ठोकले. तर दक्षिण आफ्रिकेसाठी डेविड मिलर आणि व्हॅन डर ड्युसेन यांनी 5-5 आणि प्रिटोरियरने चार उत्तुंग षटकार ठोकले. तसेच डेव्हिड मिलर आणि रॅसी व्हॅन डर ड्युसेन यांनी चौथ्या विकेटसाठी 131 धावांची नाबाद भागीदारी रचली, जी टी-20 क्रिकेटमध्ये भारताविरुद्धची ही भागीदारी देखील सर्वोच्च ठरली. दक्षिण आफ्रिकेने अवघ्या 19.1 षटकांत लक्ष्याचा पाठलाग करून 5 सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने आघाडी घेतली.
पाहुण्या संघाने 19.1 षटकात 211 धावांचे लक्ष्य गाठून भारताविरुद्ध टी-20 क्रिकेटमधील सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम नोंदवला. याआधीही दक्षिण आफ्रिकेने 2015 मध्ये भारतासमोर 200 धावांचे यशस्वी पाठलाग केले होते. त्याच वेळी, टी-20 क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचा हा सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग आहे. यापूर्वी 2007 मध्ये या संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध 206 धावांचे यशस्वी पाठलाग केला होता. याशिवाय भारताने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये प्रथम फलंदाजी करताना 12 वेळा 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत, परंतु गुरुवारी प्रथमच 200 पेक्षा जास्त धावांचा बचाव करण्यात ते अपयशी ठरले.