IND vs SA 1st ODI 2022: पार्लच्या बोलंड पार्क (Boland Park) येथे मालिकेच्या पहिल्या सामन्यात केएल राहुलच्या (KLRahul) पाहुण्या टीम इंडियाला (Team India) 31 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 297 धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडिया 265 धावाच करू शकली. बोलंड पार्कच्या मैदानावर टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेने (South Africa) पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार टेंबा बावुमा आणि रसी वॅन डर डुसेन यांच्या द्विशतकी भागीदारीने तो निर्णय योग्य ठरला. दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारीने भारतीय गोलंदाजांना विकेटसाठी जोरदार संघर्ष करायला लावला. पहिल्या सामन्याचा निर्णय टीम इंडियाच्या बाजूने लागला नसला तरी सलामीच्या एकदिवसीय मॅचमध्ये काही मत्त्वपूर्ण रेकॉर्ड बनले जे खालीलप्रमाणे आहेत. (IND vs SA 1st ODI 2022: पहिला मान दक्षिण आफ्रिकेचा; टीम इंडियाला धावांनी लोळवून Proteas ची मालिकेत 1-0 ने आघाडी, धवन-कोहलीचे अर्धशतक वाया)
1. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. डावातील 9वी धाव घेताच विराट परदेशात भारतासाठी सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा भारतीय फलंदाज बनला आहे. त्याने या बाबतीत सचिनला पछाडले. सचिनने भारताबाहेर विरोधी संघांच्या घरच्या मैदानात एकूण 5065 धावा केल्या आहेत.
2. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेत भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराटने राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांना मागे टाकले आहे. विराटने या मालिकेत 27 धावा करत या दोघांना मागे सोडले आहे. विराटने आता 1338 धावा केल्या असून गांगुलीने 1313, तर द्रविडने 1309 धावा केल्या आहेत.
3. दक्षिण आफ्रिकेच्या दोन फलंदाजांनी घरच्या मैदानावर एकाच एकदिवसीय सामन्यात भारताविरुद्ध शतक झळकावण्याची आजची तिसरी वेळ ठरली आहे. आजच्या सामन्यात कर्णधार टेंबा बावुमाने 110 तर रॅसी वॅन डर डुसेनने नाबाद 129 धावा ठोकल्या.
4. केएल राहुल त्याच्या 39व्या एकदिवसीय सामन्यात प्रथमच भारताचा कर्णधार बनला. मोहिंदर अमरनाथ यांनी ऑक्टोबर 1984 (35 एकदिवसीय सामने) मध्ये 50 एकदिवसीय सामने खेळण्यापूर्वी अखेरीस भारताचे नेतृत्व केले होते.
5. केएल राहुल हा सय्यद किरमाणी आणि वीरेंद्र सेहवाग नंतर लिस्ट ए क्रिकेटमध्ये कर्णधार नसताना एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करणारा तिसरा खेळाडू आहे.
6. टेंबा बावुमा आणि रॅसी व्हॅन डर डुसेन यांच्यातील 204 ही दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील वनडे मालिकेतील चौथ्या विकेटसाठी केलेली सर्वोच्च भागीदारी आहे.