पाकिस्तान टीम (Photo Credit: PTI)

IND vs PAK, T20 WC 2021: आयसीसी स्पर्धांमध्ये भारताविरुद्ध (India) पाकिस्तान संघाचा  (Pakistan Team) विक्रम विशेष नाही. परिस्थिती अशी आहे की आतापर्यंत पाकिस्तान कधीही विश्वचषक किंवा टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताला हरवू शकलेला नाही. 2007 टी-20 विश्वचषकात (T20 World Cup) दोन्ही संघांमध्ये एक सामना बरोबरीत सुटला होता, पण भारताने तो सामना बॉल आउटमध्ये जिंकला. हा विक्रम असूनही, पाकिस्तान गोलंदाजी अष्टपैलू हसन अलीने (Hasan Ali) टीम इंडियाला (Team India) चेतावणी दिली आहे आणि म्हटले आहे की आम्ही 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल (Champions Trophy Final) प्रमाणे टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला हरवू. टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असून दोन्ही संघांमधील सामना 24 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. क्रिकेटमधील सर्वात मोठे प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान दोन्ही एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. लंडन येथे 2017 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल सामन्यात पाकिस्तानने भारताला चकित करून एक जबरदस्त विजय मिळवला होता. (T20 World Cup 2021: पाकिस्तान कर्णधार बाबर आजमचा दावा, म्हणाला- ‘टीम इंडियावर आमच्यापेक्षा जास्त दबाव’, कारणही केले स्पष्ट)

त्यानंतर पाकिस्तान 2018 आशिया चषक आणि 2019 विश्वचषक स्पर्धेत भारताकडून पराभूत झाला आहे. हसन अलीने हायलाइट केले की वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामने नेहमीच खेळाडूंवर अतिरिक्त दबाव आणतात परंतु पाकिस्तानला त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध चांगली कामगिरी करण्याचा विश्वास आहे. “जेव्हा आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी (2017 मध्ये) जिंकलो, तेव्हा आमच्यासाठी खूप चांगला काळ होता आणि आम्ही त्यांना टी-20 विश्वचषकात पुन्हा हरवण्याचा प्रयत्न करू. आम्ही आमचा सर्वोत्तम प्रयत्न करू. भारताविरुद्ध खेळणे नेहमीच दडपणाचा खेळ असतो. दोन्ही देशांच्या चाहत्यांच्या अपेक्षा,” हसन अली म्हणाला. आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेपूर्वी पाकिस्तानी संघाकडून बरीच वक्तव्ये केली जातात. “ते लोक देखील साधारणपणे क्रिकेट बघत नाहीत ते सुद्धा भारत विरुद्ध पाकिस्तानचे सामने फॉलो करतात, त्यामुळे खेळाडूंवर दबाव जास्त असतो पण आम्ही ते सर्वोत्तम देऊ.”

दुसरीकडे, हसनला असेही वाटते की स्पिनर्स यूएईवर वर्चस्व गाजवतील परंतु याचा अर्थ असा नाही की वेगवान गोलंदाज तिथल्या कोरड्या परिस्थितीत चांगली कामगिरी करू शकणार नाहीत. भारताने त्यांच्या 15 जणांच्या संघात तब्बल 5 फिरकी गोलंदाजांची निवड केली आहे पण हसन अलीला वाटते की वेगवान गोलंदाज यूएईमधील परिस्थितीचाही चांगला वापर करू शकतात. “आम्हाला अशा परिस्थितीत गोलंदाजी कशी करायची हे माहित आहे परंतु आपण पाहू शकता की सर्व संघांनी त्यांच्या संघात अनेक फिरकीपटू निवडले आहेत.”