प्रशासक समितीचे प्रमुख विनोद राय (Vinod Rai) यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भारत (India)-पाकिस्तान (Pakistan) संबंधांविषयी मोठे विधान केले. राय म्हणाले की, जर भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानविरुद्ध खेळला तर ते सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जातील. मागील सहा वर्षांत दोन्ही देशांदरम्यान एकाही द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळली गेली नाहीत आणि सध्याच्या राजकीय उतार-चढाव यांच्यादरम्यान ते शक्य झाले असे दिसत नाही. भारत आणि पाकिस्तान देशांतिल संबंध दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. आणि याचा सर्वात मोठा परिणाम होत आहे क्रीडा क्षेत्रावर. यामुळे चाहत्यांना भारत-पाकिस्तान सारख्या रोमांचक सामान्यांपासून वंचित राहावे लागत आहे. भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघातील सामना इंग्लंड-ऑस्ट्रेलियातील अॅशेस मालिकेप्रमाणे आहे. (T20 World Cup 2007: टीम इंडियाच्या पहिल्या टी-20 विश्वचषक विजयाची 12 वर्ष; जोगिंदर शर्मा, गौतम गंभीर यांनी केले 'हे Tweet)
राय यांनी आपल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, "पाकिस्तानबरोबर खेळण्याबद्दल बोलताना मला असे वाटते की सरकारचे धोरण आहे ... की तुम्ही तटस्थ ठिकाणी खेळू शकता पण एकमेकांच्या देशात नाही. आमच्याकडून आम्ही हे स्पष्ट आहे की तटस्थ ठिकाणी आम्ही कोणत्याही देशाविरुद्ध खेळण्यास तयार आहोत." दरम्यान, राय यांनी हे विधान जरी केले असले तरीही दोन्ही देशांमधील तणावपूर्ण स्थिती पाहता सध्या तरी तटस्थ ठिकाणी पाकिस्तानविरूद्ध कोणतीही मालिका खेळणे शक्य नाही. तर सध्या, पाकिस्तान अनेक वर्षांनी श्रीलंका (Sri Lanka) संघाचे स्वागत करण्याची तयारी करत आहे. 2009 मध्ये श्रीलंका संघावर हल्ला करण्यात आल्यानंतर पहिल्यांदा श्रीलंकाई संघ पाकिस्तान दौरा करणार आहे.
फेब्रुवारीमध्ये जम्मू-काश्मीरच्ये पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर विश्वचषकमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी मागणी केली जात होती परंतु आयसीसीच्या नियमांनुसार टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध खेळावे लागले. आणि टीम इंडियाने सातव्यांदा पाकिस्तानला पराभूत केले. पण, आता दोन्ही देशांमधील संबंधांची अवस्था अधिक गुंतागुंतीची बनली आहे आणि विनोद राय यांचे विधान किती प्रमाणात शक्य होईल, हे सांगणे फार कठीण आहे.