2007 मध्ये एमएस धोनी याच्या नेतृत्वात भारतीय संघाने (Indian Team) ते काम केले ज्यामुळे भारतीय क्रिकेटला सर्वात सामर्थ्यवान संघाची उपाधी मिळाली. दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये झालेल्या भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील पहिल्या टी-20 विश्वचषक फायनलमध्ये माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir)  याच्या महत्त्वपूर्ण खेळीमुळे भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकचा पराभव करत पहिल्या टी-20 विश्वचषकवर आपले नाव लिहिले. या मॅचमध्ये गंभीरने 8 चौकार आणि 2 षटकार मारत 54 चेंडूत 75 धावा फटकावल्या. 2007 च्या टी-20 विश्वचषकसाठी धोनीला टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले होते. कर्णधार म्हणून धोनीने या स्पर्धेत चमत्कार केले आणि विजेतेपद जिंकले. त्यानंतर, संपूर्ण भारत धोनीमय झाले होते. (12 वर्षापूर्वी आज टीम इंडियाने जिंकले होते पहिले टी-20 विश्वचषक, रोमांचक मॅचमध्ये पाकिस्तान ला केले पराभूत)

12 वर्ष पूर्वीच्या क्षणाची आठवण काढत गंभीर आणि माजी वेगवान गोलंदाज जोगिंदर सिंह यांनी ट्विटरवर खास ट्विट शेअर केले. याद्वारे दोघांनी आपल्या आठवणी उजागर केल्या. गंभीरने लिहिले की, 'अब्ज लोकांची स्वप्ने पूर्ण करण्याची आणि वर्ल्ड चॅम्पियन्सचा मुकुट मिळविण्याची घाई'. पाकिस्तानविरुद्ध काही भारतीय फलंदाजांनी फायनलमध्ये निराश केले तर गंभीरने स्थिर राहत 54 चेंडूत 75 धावा केल्या. शिवाय, टी-20 विश्वचषक फायनलमध्ये गंभीरने भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. गंभीरऐवजी, जोगिंदर शर्मा (Joginder Sharma) म्हणाला, टी-20 चॅम्पियन संघाची 12 वर्षे, 12 वर्ष कशी गेली कळलीच नाही, तुमच्या भरपूर प्रेमाबद्दल सर्वांचे आभार'.

गंभीर

जोगिंदर

या मॅचमध्ये जोगिंदर शर्माने शेवटच्या ओव्हरमध्ये पाकिस्तानला विजयाच्या जवळ नेऊन ठेवणाऱ्या मिसबाह-उल-हक याला अगदी मोक्याच्या क्षणी बाद करून भारताला विश्वविजेते बनवले. भारताचा संघ हा सामना 5 धावांनी जिंकण्यात यशस्वी राहिला. या स्पर्धेत धोनीच्या संघाने एका मागोमाग एक मॅच जिंकत यश मिळवून अंतिम फेरीत पाकिस्तानला पराभूत केले आणि टी-20 विश्वचषक जिंकणारा पहिला संघ बनला. पण, यानंतर आतापर्यंत टीम इंडियाला पुन्हा असे यश संपादन करता आले नाही.