IND vs NZ 1st Test: सौरव गांगुली याला विराट कोहली टाकणार मागे, पहिल्या सामन्यात बनू शकतात 'हे' प्रमुख रेकॉर्डस्
टीम इंडिया (Photo Credit: Getty Images)

21 फेब्रुवारीपासून वेलिंग्टनमध्ये सुरू होणाऱ्या न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला माजी भारतीय कर्णधार आणि बीसीसीआयचे सध्याचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्यासह अनेक दिग्गजांना मागे टाकण्याची संधी आहे. रन मशीन विराटने आजवर खेळलेल्या 84 कसोटी सामन्यात 54.97 च्या सरासरीने 7207 धावा केल्या आहेत आणि गांगुलीला मागे सोडण्यासाठी त्याला 11 धावांची गरज आहे. सौरवने 113 कसोटी सामन्यांमध्ये 42.17 च्या सरासरीने 7212 धावा केल्या आहेत. शिवाय, या मालिकेत कोहलीला केवळ गांगुलीच नाही तर इतर अनेक दिग्गजांनाही मागे सोडण्याची संधी आहे. यात वेस्ट इंडिजचा क्रिस गेल, ऑस्ट्रेलियाचे स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर, इंग्लंडचे वाली हेमंड आणि दक्षिण आफ्रिकेचे गॅरी कर्स्टन यांचा समावेश आहेत. टेस्ट क्रिकेट सर्वाधिक धावांच्या बाबतीत सध्या हे सर्व विराटच्या पुढे आहेत. जर विराटला हे काम यश मिळाले तर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो 42 व्या क्रमांकावर पोचेल. (IND vs NZ 1st Test: रॉस टेलर याला पहिल्या टेस्ट सामन्यात 'रायरेस्ट ऑफ रेअर' कामगिरी करण्याची संधी; वनडे, टी-20 नंतर टेस्टमध्ये रचणार इतिहास)

विराट व्यतिरिक्त भारताकग्य इतर खेळाडूंनाही या मालिकेत वैयक्तिक कामगिरी करण्याची संधी असेल. जाणून घ्या:

1. मयंक अग्रवाल करू शकतो 1000 कसोटी धावा

टीम इंडियाच्या कसोटी संघातील सलामी फलंदाज मयंक अग्रवालला कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण करण्यासाठी फक्त 128 धावांची आवश्यकता आहे. मयंकने आजवर खेळल्या नऊ कसोटी सामन्यात 67.07 च्या सरासरीने 872 धावा केल्या आहेत.

2. रवींद्र जडेजाच्या 50 टेस्ट

अष्टपैलू रवींद्र जडेजा या मालिकेच्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये खेळत 50 कसोटी पूर्ण करेल आणि त्याला कसोटीत 2,000 धावा पूर्ण करण्यासाठी 156 धावांची आवश्यकता आहे.

3. चेतेश्वर पुजाराला 6000 धावा पूर्ण करण्याची संधी

कसोटी फलंदाज पुजाराने सराव सामन्यात जबरदस्त फॉर्म दर्शवला आणि तो कायम ठेवत तर त्याला 6000 धावा पूर्ण करण्याची संधी असेल. पुजाराने आजवर खेळल्या 75 कसोटी सामन्यांमध्ये 49.48 च्या सरासरीने 5740 धावा केल्या आहेत आणि त्याला 6,000 टेस्ट धावा पूर्ण करण्यासाठी 260 धावांची आवश्यकता आहे.

4. इशांत शर्माच्या 300 टेस्ट विकेट्स

गोलंदाजीत वेगवान गोलंदाज इशांत शर्माला 300 विकेट्स पूर्ण करण्याची संधी असेल. इशांतने आतापर्यंत 96 कसोटीत 32.68 च्या सरासरीने 292 विकेट्स घेतल्या आहेत आणि 300 विकेट्स पूर्ण करण्यापासून तो आठ विकेट दूर आहेत.

5. अश्विन दिग्गजांना मागे टाकण्याची शक्यता

भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनलाही काही दिग्गजांना मागे टाकण्याची संधी असेल. टेस्ट विकेट्सच्या बाबतीत अश्विन सध्या माजी पाकिस्तानी गोलंदाज इमरान खान आणि माजी किवी कर्णधार डॅनियल व्हिटोरीसह संयुक्तपणे 362 टेस्ट विकेट्स घेतल्या आहेत. मालिकेत एक विकेट घेताच अश्विन या दोन्ही गोलंदाजांना मागे टाकेल.

6. विराट कोहली करू शकतो वेगवान 22,00 आंतरराष्ट्रीय धावा

भारतीय कर्णधार, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 22,000 धावा पूर्ण करणारा वेगवान फलंदाज होण्यापासून अवघ्या 137 धावा दूर आहे. या क्षणी तो अव्वल क्रमांकाचा टेस्ट फलंदाज आहे आणि त्याने आपल्या पहिल्या सामन्यात महत्त्वाचा टप्पा गाठले असे दिसत आहे.

भारत-न्यूझीलंडमध्ये दोन सामन्यांची टेस्ट मालिका खेळली जाईल. पहिला 21 फेब्रुवारी आणि दुसरा 29 फेब्रुवारीला खेळला जाईल.