IND vs NZ 1st Test: रॉस टेलर याला पहिल्या टेस्ट सामन्यात 'रायरेस्ट ऑफ रेअर' कामगिरी करण्याची संधी; वनडे, टी-20 नंतर टेस्टमध्ये रचणार इतिहास
न्यूझीलंडचा रॉस टेलरला टीम इंडियाविरुद्ध पहिल्या टेस्ट सामन्यात ऐतिहासिक कामगिरी करण्यावर लक्ष्य आहे. भारत आणि न्यूझीलंडमध्ये जेव्हा पहिला कसोटी वेलिंग्टनमध्ये खेळला जाईल, तेव्हा टेलर आपला 100 वा कसोटी सामना खेळेल. भारतविरुद्ध किवीच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये संधी मिळताच टेलर 100 वनडे, टी-20 आणि टेस्ट सामने खेळणारा विश्वातील पहिला क्रिकेटपटू ठरेल.
टीम इंडिया (India) विरुद्ध 21 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या पहिल्या टेस्ट सामन्यात न्यूझीलंडचा (New Zealand) रॉस टेलर (Ross Taylor) याला ऐतिहासिक कामगिरी करण्यावर लक्ष्य आहे. टेलर हा न्यूझीलंडचा पहिला क्रिकेटपटू आहे ज्याने 100 टी-20 सामने खेळले आहेत. त्यातील सामने अलीकडेच भारताविरुद्ध खेळले होते. भारत आणि न्यूझीलंडमध्ये जेव्हा पहिला कसोटी वेलिंग्टनमध्ये खेळला जाईल, तेव्हा टेलर आपला 100 वा कसोटी सामना खेळेल. भारतविरुद्ध किवीच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये संधी मिळताच टेलर 100 वनडे, टी-20 आणि टेस्ट सामने खेळणारा विश्वातील पहिला क्रिकेटपटू ठरेल. टेलरचा हा विक्रम 'रायरेस्ट ऑफ रेअर' असेल कारण यापूर्वी कोणत्याही फलंदाजाने अशी कामगिरी केलेली नाही. शिवाय, डॅनियल व्हेटोरी, स्टीफन फ्लेमिंग आणि ब्रॅंडन मॅक्युलमनंतर 100 कसोटी सामने खेळणारा तो न्यूझीलंडचा तिसरा खेळाडू ठरला आहे. टेलरने न्यूझीलंडकडून टेस्टमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. गेल्या महिन्यात सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध फ्लेमिंगच्या 7,172 धावा मागे टाकत टेलर कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. (IND vs NZ Test 2020: मुंबईत जन्मलेला न्यूझीलंड खेळाडू एजाज पटेल टीम इंडियासाठी ठरू शकतो घातक)
त्याच्या 100 व्या कसोटी सामन्यापूर्वी टेलरने सांगितले की आपला 36 वा वाढदिवस जवळ आल्याने आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपविण्याचा त्याचा कोणताही हेतू नाही. ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये पुरुषांच्या विश्वचषकच्या प्रारंभ होण्यापूर्वी न्यूझीलंडच्या टी-20 स्पर्धेसाठीच्या टीममध्ये समावेश होण्याची इच्छा असल्याचे टेलरने सांगितले. शिवाय, 2023 मध्ये भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषक स्पर्धेतही खेळण्यात त्याने नाकारले नाही. गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्ध झालेल्या थरारक सामन्यात तो न्यूझीलंडकडून खेळला होता.
यापूर्वी झालेल्या वनडे मालिकेत टेलरने न्यूझीलंडकडून महत्वपूर्ण योगदान दिले होते. त्याने दोन्ही देशांमध्ये सर्वाधिक धावा केल्या. त्याने 3 सामन्यात 194.00 च्या सरासरीने 194 धावा केल्या होत्या. यात एक शतक आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे.
(The above story first appeared on LatestLY on Feb 18, 2020 03:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

