IND vs NZ 2nd ODI: हेन्री निकोल्स ला Time-Out झाल्यावरही रिव्यू दिल्याने संतप्त विराट कोहली याने मैदानावर घातला अंपायरशी वाद
अंपायरवर भडकला विराट कोहली (Photo Credits: Twitter/ Flashcric)

मागील काही महिन्यांपासून क्रिकेट सामन्यात अंपायरचे निर्णय विवादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. आणि भारत (India)-न्यूझीलंड (New Zealand) मधील ऑकलँड वनडे सामन्यात असेच काहीसे पाहायला मिळाले. दोन्ही देशांत 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना इडन पार्क मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात टॉस जिंकून टीम इंडियाने पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण गोलंडनज चांगली सुरुवात करू शकले नाही. किवी सलामी जोडी मार्टिन गप्टिल-हेन्री निकोल्स (Henry Nicholls) यांनी अर्धशतकी भागीदारी केली आणि भारताच्या गोलंदाजांची क्लास घेतली. मात्र, युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने निकोल्सला एलबीडब्ल्यू आऊट केले आणि संघासाठी पहिली विकेट घेतली. चहलच्या अपीलवर अंपायरने आऊट दिल्यावर निकोल्सने रिव्यू घेण्याचे ठरवले. रिव्यू घेण्यासाठी त्याने 15 सेकंदाची वेळ ओलांडली असतानाही अंपायर ब्रुस ऑक्सनफोर्डने रिव्यू मंजूर केला आणि थर्ड अंपायरला रिव्यू करण्याचे संकेत दिले. अंपायरच्या या निर्णयामुळे भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) संतापला आणि त्याने मैदानावर अंपायरशी वाद घातला. (Celebrity Brand Value 2019: विराट कोहली याची ब्रँड व्हॅल्यू आहे रोहित शर्मापेक्षा 10 पट जास्त, सलग तिसऱ्यांदा मिळवले अव्वल स्थान)

निकोल्सला निर्णयाविरुद्ध रिब्यू घेण्याचा फायदा झाला नाही. त्याला थर्ड अंपायरने बाद केले असले तरीही कोहलीला निश्चितच रिव्यूचा निर्णय फारसा पसंत पडलेला नाही. बऱ्याच वेळेच्या प्रतिक्षेनंतर चहलने गप्टिल आणि निकोल्सची  93 धावांची भागीदारी मोडली. निकोल्स 59 चेंडूत 41 धावा काढून बाद झाला. बर्‍याच वेळेस कोहलीला त्याच्या ‘अहंकारी’ वागण्याबद्दलही फत्करण्यात आले, पण यंदा नेटकऱ्यांनी त्याचे समर्थन केले.

हॅमिल्टनमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने 6 विकेटने विजय मिळवला आणि मालिकेत आघाडी घेतली. आजच्या सामन्यात दोन्ही संघाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करण्यात आले आहे. मोहम्मद शमी, कुलदीप यादवना भारताने विश्रांती दिली असून नवदीप सैनी आणि चहलला स्थान मिळाले आहे.  न्यूझीलंडकडून मिशेल सॅटनर आणि स्कॉट कुग्गेलैनच्या जागी काइल जैमिसन आणि मार्क चैपमैन यांना संघात स्थान देण्यात आले.