IND vs NZ 2020: न्यूझीलंडविरुद्ध मालिकेने खराब केला विराट कोहली चा संपूर्ण 'खेळ', या दौऱ्यावरील त्याची कामगिरी जाणून घ्या
विराट कोहली (Photo Credit: IANS)

पुन्हा एकदा भारतीय कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) बॅट शांत राहिली आणि यासह न्यूझीलंड (New Zealand) दौरा त्याच्या कारकिर्दीतील दुसरा सर्वात वाईट दौरा ठरला. क्राइस्टचर्च (Christchurch) मध्ये यजमान न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या डावातही कोहलीला धावांचा दुष्काळ संपवता आला नाही. रविवारी कॉलिन डी ग्रैंडहोमच्या चेंडूवर कोहली दुसऱ्या डावात 14 धावा करून एलबीडब्ल्यू झाला. यासह, न्यूझीलंड दौर्‍यावर त्याला 11 डावात फक्त 218 धावा करता आल्या. हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात दौरा ठरला आहे. या दौर्‍यावर कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध तीनही स्वरूपात 45, 11, 38, 11, 51, 15, 9, 2, 19, 3, 14 धावा केल्या. कोहलीचा खराब फॉर्म यंदाच्या दौऱ्यावर अन्य गोष्टींसोबत चर्चेचा विषय बनला. न्यूझीलंडच्या या दौऱ्यावरील 11 डावांमध्ये विराटच्या फलंदाजीची स्थिती दिवसेंदिवस खराब होत गेली. त्याच्या एकूण 218 धावा एखाद्या दौऱ्यावर 3 स्वरूप खेळल्या सर्व सामन्यांमधील सर्वत कमी धावसंख्या आहेत. (IND vs NZ 2nd Test: क्राइस्टचर्च मॅच दरम्यान आक्रमक झाला विराट कोहली, प्रेक्षकाकडे बघून दिली संतापजनक प्रतिक्रिया Video)

यापूर्वी 2014 मध्ये त्याला या टप्प्यातून जावे लागले. 2014 च्या इंग्लंड दौर्‍यादरम्यान त्याने 15 डावात 254 धावा केल्या होत्या. त्याची सरासरी 18 च्या आसपास होती. सुमारे सहा वर्षानंतर तो पुन्हा एकदा त्याच्या सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. कोहली हा अत्यंत आक्रमक फलंदाज आहे. त्याच्या नावावर अनेक शतकांचे रेकॉर्ड आहेत. प्रत्येक दौऱ्यावर त्याने एक मोठा डाव खेळला आहे. पण यावेळी चाहत्यांना ते पाहायला जमलं नाही. शतकाशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हातिसरा सर्वात मोठा वेळ आहे. यापूर्वी 25 फेब्रुवारी ते ऑक्टोबर 2014 आणि 24 फेब्रुवारी ते सप्टेंबर 2011 या काळात त्याने एकही आंतराष्ट्रीय शतक केले नव्हते. आणि आता 22 डिसेंबर 2019 पासून अद्याप एकही शतक केले नाही.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या महत्त्वपूर्ण कसोटी मालिकेत कोहलीचा फॉर्म भारताची मोठी चिंता बनला आहे. 2 कसोटीच्या 4 डावांमध्ये कोहली 9.50 च्या सरासरीने केवळ 38 धावा करू शकला. परदेशातील कसोटी मालिकेतली ही त्याची सर्वात कमी सरासरी आहे. त्याच्या कारकिर्दीतील कसोटी मालिकेत 20 धावाचा टप्पा न गाठण्याची विराटची ही दुसरीच वेळ आहे. न्यूझीलंड कसोटीत त्याने 2, 19, 3, 14 धावा केल्या. मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने दमदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले आणि न्यूझीलंडला बॅकफूटवर ठकलले. 63 धावांवर एकही गडी न गमावणाऱ्या न्यूझीलंडचा पहिला डाव 235 धावांत संपुष्टात आला.