विराट कोहली (Photo Credit: Twitter)

भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), एक उत्कट आणि लढाऊ खेळाडू आहे जो अनेकदा आपल्या भावना मैदानावर व्यक्त करून जातो. रविवारी, जसप्रीत बुमराहने न्यूझीलंडचा (New Zealand) कर्णधार केन विल्यमसनला (Kane Williamson) फक्त 3 धावांवर बाद केल्यावर विराटने आक्रमक पद्धतीने विकेट साजरी केली. न्यूझीलंड दौऱ्यावर कोहली फलंदाजीने काही कमाल करू शकला नाही. मात्र रविवारी त्याचा मित्र विल्यमसनविरुद्ध कोहलीचा जुना फॉर्म त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळाला. क्राइस्टचर्च (Christchurch) येथे खेळल्या जाणार्‍या दुसर्‍या कसोटीच्या दुसर्‍या दिवशी भारताने शानदार सुरुवात केली आणि पहिल्या सत्रात पाच गडी बाद केले. टॉम ब्लंडेलला उमेश यादवने एलबीडब्ल्यू आऊट करून भारताला पहिले यश मिळवून दिले. यानंतर क्रीजवर आलेला विल्यमसन जसप्रीत बुमराहचा शिकार बनला. (IND vs NZ 2nd Test Day 2: टीम इंडियाने दुसऱ्या दिवशी केली जोरदार सुरुवात, Lunch पर्यंत न्यूझीलंडने 5 विकेट गमावून केल्या 142 धावा)

विल्यमसनचा बुमराहच्या चेंडूवर रिषभ पंतकडे विकेटच्या मागे झेलबाद झाला. विल्यमसन आऊट होताच कर्णधार कोहली आक्रमक अंदाजात दिसला. तो सतत ओरडत आणि अत्यंत संतापजनक मार्गाने विकेट साजरा करताना दिसला. पाहा व्हिडिओ:

यानंतर त्याने प्रेक्षकाकडेही रागाने पहिले आणि काहीतरी बोलताना दिसला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. कोहलीच्या या सेलिब्रेशननंतर चाहते ट्विटरवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हेन्री निकोल्स (Henry Nicholls) ला माघारी पाठवण्यासाठी विराटने शमीच्या गोलंदाजीवर जबरदस्त झेल घेतल्यानंतर ही घटना घडली. अनेक चाहत्यांनीही कोहलीला पुन्हा जुनं स्वरूपात पाहून आनंद झाला. यूजर्सने ट्विट केले की कोहली त्याच्या वास्तविक रूपात आला आहे. काही चाहत्यांनी कोहलीच्या या उत्सवाची तुलना दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज कगिसो रबाडाशी केली, ज्याला आयसीसीने जो रुटच्या विकेटच्या सेलिब्रेटनंतर एका सामन्याची बंदी घातली.

डिमेरिट पॉईंटसाठी योग्य

रबाडाच्या सेलिब्रेशनपेक्षा वेगळे कसे

देवाचे आभार

कोहलीला पुन्हा आली स्टोक्सची आठवण

यापूर्वीच्या पहिल्या दिवशी, न्यूझीलंडमध्ये कोहलीचा खराब फॉर्म चालू राहिला आणि भारताचा कर्णधार 3 धावांवर बाद झाला. यंदाच्या न्यूझीलंड दौर्‍यावर कोहलीने 10 डावात 204 धावा आणि फक्त 1 अर्धशतक ठोकले आहे.