IND vs NZ 2nd Test Day 2: टीम इंडियाने दुसऱ्या दिवशी केली जोरदार सुरुवात, Lunch पर्यंत न्यूझीलंडने 5 विकेट गमावून केल्या 142 धावा
भारतीय क्रिकेट टीम (Photo Credit: IANS)

भारत (India) आणि यजमान न्यूझीलंड (New Zealand) संघात क्राइस्टचर्चमध्ये सुरु असलेल्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या दुपारच्या जेवणाची घोषणा झाली आहे. लंचपर्यंत न्यूझीलंडने 5 विकेट्स गमावून 142 धावा केल्या आहेत. बीजे वाटलिंग (BJ Watling) आणि कॉलिन डी ग्रैंडहोम (Colin de Grandhomme) नाबाद खेळत आहेत. भारताच्या पहिल्या डावातील 242 धावांच्या प्रत्युत्तरात किवी संघ अजून 100 धावा मागे आहेत. मोहम्मद शमी (Mohammed Shami) 2 गडी बाद केले तर, जसप्रीत बुमराह, उमेश यादव आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात न्यूझीलंडने टॉम ब्लंडेल, केन विल्यमसन, रॉस टेलर, टॉम लाथम आणि हेन्री निकोल्स यांच्या महत्वपूर्ण अशा 5 विकेट्स गमावल्या. (IND vs NZ 2nd Test: पृथ्वी शॉ ने न्यूझीलंडमध्ये ठोकले अर्धशतक, सचिन तेंडुलकर नंतर 'हा' पराक्रम करणारा बनला दुसरा भारतीय फलंदाज)

टॉस गमावून पहिले फलंदाजी करताना भारताचा पहिला डाव 242 धावांवर संपुष्टात आला. काईल जैमीसनच्या 'पंच' पुढे भारतीय फलंदाज निरुत्तर दिसले. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला उमेशने भारताला पहिली विकेट मिळवून दिली. त्याने किवी सलामी फलंदाजब्लंडेलला 30 धावांवर एलबीडब्ल्यू आऊट केले. त्यानंतर बुमराहनेविल्यमसनला स्वस्तात माघारी पाठवले.त्याने विल्यमसनला 3 धावांवर विकेटकीपर रिषभ पंतकडे कॅच आऊट केले. सत्राची अखेरची विकेट टेलरच्या रूपात पडली. जडेजाने 15 धावांवर खेळणाऱ्या टेलरला उमेश यादवकडे झेलबाद केले. 36 ओव्हरनंतर न्यूझीलंडने 100 धावांचा टप्पा गाठला. लाथमने 119 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, ज्यानंतर शमीच्या चेंडूवर तो बोल्ड झाला. निकोल्स 14 धावा करून विराट कोहलीकडे कॅच आऊट झाला.

शनिवारी टॉस गमावून पहिले बॅटिंग करत भारत 242 धावांवर ऑलआऊट झाला. कर्णधार विराट कोहली, मयंक अग्रवाल, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा आणि उमेश यादव दाहीचा आकडाही स्पर्श करू शकले नाही. पृथ्वी शॉने 54, हनुमा विहारीने 55 आणि पुजाराने 54 धावा केल्या. दुसरीकडे, न्यूझीलंडकडून आपला दुसरा कसोटी सामना खेळणाऱ्या जैमीसनने त्याच्या कसोटी कारकीर्दीत पहिल्यांदा 5 गडी बाद केले. टीम साऊथी आणि ट्रेंट बोल्ट यांना प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळालल्या. नील वॅग्नरला 1 विकेट मिळाली.