IND vs ENG Test Series 2021: अहमदाबादमध्ये (Ahmedabad) खेळण्यात आलेल्या भारत (India) आणि इंग्लंड (England) संघातील तिसऱ्या पिंक-बॉल टेस्ट (Pink-Ball Test) सामन्यात इंग्लिश टीमच्या पराभवावर महिला संघाची खेळाडू अलेक्झांड्रा हार्टलेने (Alexandra Hartley) केलेल्या एका ट्विटवरून इंग्लंडच्या महिला आणि पुरूष क्रिकेटपटूंमध्ये सोशल मीडियावर सामना रंगला. इंग्लंडच्या महिला संघाचा न्यूझीलंड संघाशी गुरूवारी भारतीय वेळेनुसार रात्री वनडे सामना सुरू होणार होता. सामना सुरू होण्यापूर्वीच अहमदाबाद कसोटी सामना संपुष्टात आला ज्यामुळे इंग्लंडची महिला खेळाडू हार्टलीने यासंबंधी ट्विट केले. “महिलांचा सामना सुरू होण्याआधी पुरूषांचा कसोटी सामना संपवल्याबद्दल इंग्लंडच्या संघाचे आभार. आता महिला क्रिकेट सामन्याचा आनंद लुटा,” तिने ट्विट केले. पण रोरी बर्न्सने (Rory Burns) त्वरित हार्टलीच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आणि निराशाजनक म्हटले. “हे ट्वीट खूपच खेदजनक आहे. पुरूष खेळाडू नेहमीच महिलांच्या क्रिकेटला प्रोत्साहन देण्याचे कर्तव्य बजावतात”, अशा शब्दात बर्न्सने हार्टलीच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली. (Ahmedabad Pitch विवादात केविन पीटरसनची उडी, Wasim Jaffer यांनी गमतीशीर Meme ट्वीट करत दिले उत्तर)
बर्न्सचे हे ट्वीट मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या तिसर्या कसोटीचा भाग असलेले त्याचे सहकारी बेन स्टोक्स आणि जेम्स अँडरसन यांनीही पसंत केले. हार्ललीच्या ट्वीटवर काही इतर इंग्लिश क्रिकेटपटूंनीही फटकार लगावली. "सरासरी ट्विट. महिला संघाने सामना गमावल्यास पुरुष संघातील कोणही असं केलं असतं वाटत नाही," बेन डकेटने ट्विट केले. 1935 पासून भारत आणि इंग्लंड संघाने सर्वात छोटा कसोटी सामना खेळला ज्यात यजमान संघाने 10 विकेटने विजय मिळवला आणि चार सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. पाच सत्रात पडलेल्या 30 विकेटपैकी 28 विकेट्स फिरकी गोलंदाजांनी घेतल्या. भारताच्या अक्षर पटेलने या सामन्यात 70 धावा देत 11 विकेट घेतल्या.
Pray, do tell. pic.twitter.com/bRY6fJbsAb
— Isabelle Westbury (@izzywestbury) February 25, 2021
बेन डकेट
Average tweet. Don’t think any of the men’s team would have been “👏🏼👏🏼👏🏼” if the women lost. https://t.co/4dgW7NMEeM
— Ben Duckett (@BenDuckett1) February 25, 2021
दुसरीकडे, या पराभवाचा फटका इंग्लिश संघाला बसला आणि त्यांना आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले. WTC फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी टीम इंडियाला फक्त ड्रॉ किंवा विजयाची गरज आहे. इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर होणाऱ्या टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करणाऱ्या संघाचा सामना न्यूझीलंड संघाशी होईल ज्यांनीं यापूर्वीच फायनलचं तिकीट मिळवलं आहे.