IND vs ENG Test Series 2021: भारतीय संघाचे (Indian Team) माजी कर्णधार आणि टेस्ट क्रिकेट तज्ञ राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी संघाच्या आगामी इंग्लंड दौऱ्याबाबत (India Tour of England) मोठी भविष्यवाणी केली आहे. यंदा इंग्लंड दौर्यावरील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत 3-2 अशा फरकाने विजय मिळवेल आणि 2007 नंतर इंग्लंडमध्ये जिंकण्याची संघासाठी ही सर्वोत्तम संधी असल्याचं द्रविडने सांगितले. इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकणारा द्रविड अखेरचा भारतीय कर्णधार होता. ईएसपीएनक्रिकइन्फोनुसार, द्रविड वेबिनार दरम्यान म्हणाले, “मला वाटते सध्याच्या घडीला भारताला सर्वात चांगली संधी आहे.” शिवाय द्रविड म्हणाले की, रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) विरुद्ध बेन स्टोक्स (Ben Stokes) यांच्यातील सामन्यामुळे ही रंजक मालिका आणखी मनोरंजक होईल. 2018 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाला पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 4-1 ने पराभवाचा सामना करावा लागला होता. कर्णधार विराट कोहलीचा या दौर्यावर बोलबाला राहिला होता. त्याने 5 सामन्यांत 59.30 च्या सरासरीने 593 धावा चोपल्या. (ICC World Test Championship च्या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंड दौऱ्यातील Test series साठी टीम इंडियाची घोषणा)
द्रविड म्हणाला, “त्यांच्या (इंग्लंड) गोलंदाजी बाबत प्रश्नच उद्भवत नाही. इंग्लंडसारखा कोणताही गोलंदाजीचा हल्ला, विशेषत: वेगवान गोलंदाजांना उतरवले तो उत्तमच असेल. त्यांच्याकडे बरेच पर्याय आहेत, पण जर तुम्ही त्यांच्या फलंदाजांकडे नजर टाकल्यास तर आपण खरोखरच जागतिक स्तरावरील फलंदाजांचा विचार कराल आणि तो जो रूट आहे. अर्थात दुसरा फलंदाज बेन स्टोक्स आहे, जो एक अष्टपैलू खेळाडू आहे, पण मला वाटते अश्विनने त्याच्याविरुद्ध चांगली कामगिरी केली पाहिजे आणि ही एक रंजक सामना असावा. मला माहित आहे की अश्विनने त्याच्या विरुद्ध (स्टोक्स) भारताविरुद्ध चांगली कामगिरी केली होती, पण तरीही मालिकेचा हा एक रंजक महामुकाबला असेल.” ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय नोंदवणाऱ्या भारतीय संघासाठी ही चांगली संधी असेल असे द्रविडचे मत आहे.
The last Indian captain to win a Test series in England backs the current crop to repeat the achievement
👉 https://t.co/qyGL8I6GD0 pic.twitter.com/N3VHxw97Re
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 9, 2021
ते म्हणाले, “भारत खूप चांगली तयारी करेल. ऑस्ट्रेलियामध्ये जिंकण्याचा आत्मविश्वास त्यांना आहे. खेळाडूंना स्वतःवर विश्वास आहे. यापूर्वी काही खेळाडू इंग्लंडमध्ये खेळले आहेत. यंदा आमची फलंदाजी खूप अनुभवी आहे. तर, ही कदाचित आमच्यासाठी सर्वात चांगली संधी आहे. भारत ही मालिका 3-2 ने जिंकू शकतो. मला वाटते की यावेळी इंग्लंडमध्ये भारत खरोखर चांगली कामगिरी करेल.”