आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (ICC World Test Championship) अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंड दौऱ्यात (England Tour) होणाऱ्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची (Team India) निवड करण्यात आली आहे. ऑल इंडिया सिनियर सिलेक्शन कमिटीने (All-India Senior Selection Committee) यासाठी 20 खेळाडूंची निवड केली आहे. यामध्ये विराट कोहली (Virat Kohli) कडे कर्णधार पदाची धुरा असून अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) कडे उपकर्णधारपद असणार आहे. याशिवाय टीम मध्ये रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, एच. विहारी, ऋषभ पंत, आर. अश्विन, आर. जडेजा, एक्सर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव हे खेळाडू असणार आहेत. दरम्यान, के. एल राहुल आणि वृद्धीमान शाह यांना फिटनेस टेस्ट पास केल्यानंतर संघामध्ये जागा मिळू शकते.
आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये सर्वाधिक 72.2 गुण पटकावत भारताने प्रथम स्थान प्राप्त केले आहे. तर 70.0 गुणांसह न्युझीलँड दुसऱ्या स्थानावर आहे. भारत आणि न्युझीलँडमध्ये या चॅम्पियनशीपचा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना 18 ते 22 जून दरम्यान इंग्लंडच्या साउथहँप्टन (Southampton) मधील मैदानावर खेळवला जाणार आहे. (ICC World Test Championship Final 2021 मध्ये या ‘सरप्राइज एंट्री’सह पहा कोणाला मिळू शकते संधी)
BCCI Tweet:
India's squad: Virat Kohli (C), Ajinkya Rahane (VC), Rohit Sharma, Gill, Mayank, Cheteshwar Pujara, H. Vihari, Rishabh (WK), R. Ashwin, R. Jadeja, Axar Patel, Washington Sundar, Bumrah, Ishant, Shami, Siraj, Shardul, Umesh.
KL Rahul & Saha (WK) subject to fitness clearance.
— BCCI (@BCCI) May 7, 2021
दरम्यान, 4 ऑगस्टपासून इंग्लंड दौऱ्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार असून पहिला सामना ट्रेंट ब्रिज मैदानावर खेळवला जाणार आहे. यावर्षी मार्चमध्ये इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेमध्ये भारताने 3-1 असा विजय पटकावत मालिका आपल्या खिशात घातली होती. इंग्लंड दौऱ्यात देखील अशीच कामगिरी करण्याचा टीम इंडियाचा मानस असेल.