ICC World Test Championship Final 2021: आयपीएलची 14 वी आवृत्ती स्थगित केल्यानंतर आता सर्वांचे लक्ष भारताच्या न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC Final) सामन्याकडे लागून आहे. पुढील महिन्यात 18 जूनपासून साऊथॅम्प्टन येथे भारत-न्यूझीलंड संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम (IND vs NZ WTC Final) सामन्यात आमनेसामने भिडतील. यासाठी भारतीय निवड समिती चार सलामीवीर, मधल्या फळीत दोन फलंदाज, दोन ते तीन विकेटकीपर, आठ किंवा नऊ वेगवान गोलंदाज आणि पाच फिरकीपटू असा जंबो संघ निवडणार असल्याचं म्हटलं जात आहे. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) समावेशाबाबत महत्त्वाचा प्रश्न कायम आहे तर इंग्लंडविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेत चमकदार कामगिरी करणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाची (Prasidh Krishna) सरप्राईज एंट्री होऊ शकते. (इंग्लंड दौऱ्यासाठी आज होऊ शकते Team India ची घोषणा, प्रत्येक जागेसाठी आहेत दमदार दावेदार; पहा संभाव्य खेळाडूंची यादी)
केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुभमन गिल आणि रोहित शर्मा प्रबळ दावेदार असल्याने सलामी जागेसाठी पृथ्वी शॉची(Prithvi Shaw) निवड होण्याची शक्यता कमी आहे. वेगवान गोलंदाजी विभागात टीम इंडियाकडे जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव असे पर्याय आधीपासूनच उपलब्ध आहे. याशिवाय मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांना जागा मिळणे जवळजवळ निश्चित मानले जात आहे. भारतीय संघात रवींद्र जडेजाचे पुनरागमन देखील निश्चित मानलं जात आहे. जडेजाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सिडनी कसोटी सामन्यात दुखापत झाली होती ज्यामुळे त्याला इंग्लंडविरुद्ध घरच्या द्विपक्षीय मालिकेतूनही बाहेर बसावे लागले होते. रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल हे फिरकीपटू म्हणून जागा निश्चित करू शकतात. संघाची मधली फळी देखील- विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत अशी असू शकते. रिद्धिमान साहा व के एस भारत यांची बॅकअप विकेटकीपर म्हणून उपलब्ध असू शकतात.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी संभावित टीम इंडिया
विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, रिद्धिमान साहा, के.एस भरत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज.