इंग्लंड दौऱ्यासाठी आज होऊ शकते Team India ची घोषणा, प्रत्येक जागेसाठी आहेत दमदार दावेदार; पहा संभाव्य खेळाडूंची यादी
टीम इंडिया (Photo Credit: Twitter/BCCI)

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप फायनल (World Test Championship Final) सामना खेळला जाणार आहे. 18 ते 22 जून दरम्यान इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन येथे दोन्ही देशांतील क्रिकेट संघात पहिल्या टेस्ट चँपियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. त्यानंतर टीम इंडिया (Team India) आणि यजमान इंग्लंड संघात कसोटी मालिका देखील खेळवली जाणार असून त्यासाठी आज मोठ्या भारतीय तुकडीची निवड होण्याची शक्यता आहे. सलामीवीर पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) कमबॅकवर सर्व चाहत्यांचे लक्ष लागून असेल. निवड समितीसमोर भारतीय संघातील (Indian Team) प्रत्येक जागेसाठी तगडे पर्याय उपलब्ध आहे. भारतातून ब्रिटनला जाणाऱ्या प्रवाशांसाठी 14 दिवसांचा कठोर क्वारंटाईन आणि देशातील सध्या कोविड-19 रिस्थितीमुळे बीसीसीआयला कमीतकमी 30 सदस्य निवडण्यास भाग पाडण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका नॉटिंगहम (Nottingham) येथे 4 ऑगस्टपासून सुरु होईल. इंडिया ए संघाचे नियमित सदस्य अभिमन्यू एस्वरन आणि प्रियांक पांचाळ पासून देवदत्त पडिक्क्ल देखील इंग्लंडच्या मोठ्या दौऱ्यासाठी निवड समितीच्या रडारवर असेल. (World Test Championship Final 2021: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी अशी असू शकते टीम इंडिया; पहा होणार कोण होणार IN)

टीम इंडियाच्या अतिरिक्त सलामी फलंदाजाच्या जागेसाठी अभिमन्यू एस्वरन, प्रियांक पांचाळ आणि धडाकेबाज देवदत्त पडिक्क्ल यांच्यात लढाई पाहायला मिळत आहे. आयपीएलमध्ये फॉर्म मिळवलेला पृथ्वी शॉ पुनरागमन करण्याची अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियामध्ये त्याला एक कसोटी सामन्यानंतर फॉर्मअभावी वगळण्यात आले होते. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेदरम्यान एस्वरन आणि पांचाल बॅक अप सलामीवीर होते. त्याचप्रमाणे रिषभ पंत व रिद्धिमान साहानंतर ईशान किशन आणि कोना भरथ यांच्यात तिसर्‍या विकेटकीपर झुंज होईल. आर अश्विन आणि रवींद्र जडेजाच्या मनगट फिरकी गोलंदाजाच्या जागेसाठी अक्षर पटेल आणि राहुल चाहरमध्ये स्पर्धा रंगेल. हार्दिक पांड्या जास्त गोलंदाजी न करताही फलंदाज अष्टपैलू असेल तर शार्दुल ठाकूरचा गोलंदाजी अष्टपैलू म्हणून वापरता केला जाऊ शकतो. टी नटराजनच्या अनुपस्थितीत डावखुरा गोलंदाजीचा पर्याय जयदेव उनादकट असू शकतो तर प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान देखील इंग्लंडवारीला जाण्याची शक्यता आहे. दुखापतीतून सावरलेले मोहम्मद शमी, हनुमा विहारी, भुवनेश्वर कुमार देखील पुनरागमन करू शकतात.

टीम इंडियाचा संभाव्य 30

सलामीवीर: रोहित शर्मा, शुभमन गिल, पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, अभिमन्यू एस्वरन, प्रियांक पांचाल/देवदत्त पडिक्क्ल.

मध्यम क्रम: चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, केएल राहुल

अष्टपैलू: वॉशिंग्टन सुंदर, हार्दिक पंड्या.

फिरकीपटू: आर अश्विन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, राहुल चाहर.

वेगवान गोलंदाज: जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, भुवनेश्वर कुमार.

नेट गोलंदाज (संभाव्य): चेतन सकारिया, अंकित राजपूत.