World Test Championship Final 2021: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी अशी असू शकते टीम इंडिया; पहा होणार कोण होणार IN, कोण OUT
टीम इंडिया (Photo Credit: Twitter/BCCI)

World Test Championship Final 2021: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 मध्यावरच स्थगित करण्यात आल्यावर आता भारतीय संघ (Indian Team) पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) फायनल सामन्यातून मैदानात उतरतील. टीम इंडिया (Team India)  आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात 18 जूनपासून साउथॅम्प्टन येथे पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. आयपीएल स्थगित झाल्यामुळे व भारतातून येणाऱ्या प्रवाश्यांवर बंदी घातल्यामुळे बीसीसीआय येत्या काही दिवसात कसोटी क्रिकेटच्या या वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा करू शकते. अशा स्थितीत आज आपण अशाच संभाव्य नावांबद्दल चर्चा करणार आहोत ज्यांची न्यूझीलंड विरोधात होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात निवड होऊ शकते. (WTC Final 2021: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी ‘विराटसेना’ वेळेपूर्वीच होणार रवाना, न्यूझीलंडशी करणार दोन हात)

विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळेल तर अजिंक्य रहाणे त्याला उपकर्णधार म्हणून साथ देण्यासाठी उपस्थित असेल. याशिवाय, मर्यादित ओव्हर संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सलामीची जबाबदारी सांभाळेल. रोहितला साथ देण्यासाठी शुभमन गिल व मयंक अग्रवालचा समावेश केला जाईल पण इंग्लंडच्या मैदानावर कोणाला संधी मिळेल हे तर वेळच सांगेल. कसोटी तज्ज्ञ चेतेश्वर पुजाराचे संघात स्थान कायम राहील. त्याच्यासोबत भारताच्या मधल्या फळीत रिषभ पंत, हनुमा विहारी व रिद्धीमान साहा देखील असतील. पंत संघाचा पहिला विकेटकीपर असून साहाला संधीची प्रतीक्षा करावी लागेल. अष्टपैलू म्हणून रवींद्र जडेजा, आर अश्विन, हार्दिक पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, गोलंदाजी विभागात अनुभवी व नवख्या खेळाडूंना संधी मिळू शकते. जडेजा, अश्विनसोबत अक्षर पटेल तिसरा फिरकी गोलंदाज असेल. वेगवान गोलंदाजी विभागात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मासह ऑस्ट्रेलिया-इंग्लंड विरोधात कमाल करणाऱ्या शार्दूल ठाकूर व मोहम्मद सिराज देखील टीम इंडियासोबत इंग्लंडवारी करू शकतात.

पहा WTC फायनलसाठी संभाव्य भारतीय संघ: विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, आर अश्विन, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.