भारत-अ कसोटी संघ (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs ENG Test 2021: इंग्लंडविरुद्ध (England) चार सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्याच्या सुरुवातीच्या दोन दिवसांत भारतीय संघाला (Indian Team) अडचणींचा सामना करावा लागला. दोन दिवसांत इंग्लंड संघाला बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना अपयशी ठरले. तिसऱ्या दिवशी संघाने पहिल्या डावात 578 धावांपर्यंत मजल मारली. या दरम्यान, भारतासाठी चांगली बातमी समोर आली की वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) फिट झाला आहे. ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजीदरम्यान दुखापतग्रस्त झालेला शमी फिट (Shami Injury) होऊन मैदानात परतला आहे. 19 डिसेंबर रोजी अ‍ॅडिलेड कसोटी सामन्याच्या दुसर्‍या डावात ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सचा (Pat Cummins) घातक चेंडू शमीच्या मनगटावर लागला होता त्यानंतर शमीच्या हाताला फ्रॅक्चर झाला आणि त्याला दौरा सोडून भारतात परत यावे लागले होते. शिवाय, दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये त्याची निवड झाली नाही. (IND vs ENG 1st Test 2021: चेन्नई टेस्ट सामन्यात भारतीय गोलंदाजांनी मोडला 10 वर्ष जुना रेकॉर्ड, केला लाजीरवाणा कीर्तिमान)

शुक्रवारी शमीने एक ट्विट केले ज्यामध्ये तो गोलंदाजी करताना दिसत आहे. शमी सध्या बेंगलोरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये नवदीप सैनीसह प्रशिक्षण घेत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेनमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेच्या शेवटच्या सामन्यात सैनीला देखील दुखापत झाली होती. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, शमीच्या मनगटाची दुखापत आता बरी झाली  असून येत्या काही दिवसांत त्याला लाईट नेट प्रॅक्टिस दिली जाईल. यादरम्यान, त्याला दररोज 18 चेंडू टाकण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हे केवळ 50 ते 60 टक्के जोर लावून टाकण्यासाठी सांगण्यात आले आहे. शमी जवळजवळ अर्ध्या महिन्यापासून गोलंदाजी करत नसल्याने त्याच्या कामाचा ताण हळूहळू वाढवला जाईल. इंग्लंडविरुद्ध गुलाबी बॉल टेस्ट सामना खेळण्यासाठी अद्याप दोन आठवडे शिल्लक आहेत. हा सामना अहमदाबाद येथे 24 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. अशा परिस्थितीत शमी सामन्याआधी तंदुरुस्त होऊन निवडीसाठी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा केली जात आहे.

दरम्यान, शमीने गोलंदाजी सुरु केली असल्याने त्याचे मनगट अगदी ठीक असल्याचे दिसत आहे. मात्र, संपूर्ण चित्र पुढील आठवड्याच्या अखेरीसच स्पष्ट होऊ शकते. भारत आणि इंग्लंड संघ पहिल्यांदा पिंक-बॉल टेस्ट सामन्यात आमने-सामने येणार आहेत.