IND vs ENG 1st Test 2021: इंग्लंडविरुद्ध (England) चेन्नई (Chennai) येथेही पहिल्या कसोटीच्या सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय (India) गोलंदाजांना चांगलाच संघर्ष करावा लागला. इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी एकूण 20 नो-बॉल टाकले ज्या दहा वर्षांत टीम इंडिया गोलंदाजांनी टाकलेले सर्वाधिक आहेत. टेस्ट क्रिकेटच्या इतिहास कोणत्याही टीमच्या गोलंदाजांनी टाकलेले हे दुसरे सर्वाधिक नो-बॉल ठरले. 2010 कोलंबो येथे तिसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेच्या पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी एकूण 16 नो-बॉल टाकले होते. 2010 मधील त्या सामन्यात सर्वाधिक 16 नो-बॉल टाकूनही टीम इंडियाने तो सामना जिंकला होता तर चाहते इंग्लंडविरुद्ध पहिल्या टेस्ट सामन्याच्या निकालाच्या अद्याप प्रतीक्षेत आहेत. 2014 मध्ये चॅटोग्राम येथे झालेल्या बांग्लादेशविरुद्ध दुसऱ्या सामन्यात श्रीलंका (Sri Lanka) संघाने सर्वाधिक 21 नो-बॉल फेकले होते. (Virat Kohli DRS Woes vs ENG: ‘कोहली रिव्यू सिस्टम भयावह आहे’, 5 चेंडूत 2 DRS वाया, टीम इंडिया कर्णधाराच्या रिव्यूवर Netizensचा चढला पारा)
चेन्नई टेस्टच्या पहिल्या डावात इंग्लड फलंदाजांनी भारतीय फिरकी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. शाहबाझ नदीम, आर अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक धावा दिल्या. नदीमने 167, अश्विन 146 आणि सुंदरने 98 धावा दिल्या. बुमराहने सर्वाधिक इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात सर्वात जास्त 7 नो-बॉल टाकले, नदीमने 6, इशांतने 5 तर अश्विनने 2 नो-बॉल टाकले. विशेष म्हणजे, 2010 मध्ये कोलंबो कसोटी सामन्यात इशांत गोलंदाजी हल्ल्याचा एक भाग होता ज्यामध्ये त्याने दोन डावांमध्ये प्रत्येकी चार नॉन-बॉल टाकले होते. दरम्यान, चेन्नईमध्ये नदीमने 44 ओव्हरमध्ये 6 नो-बॉल टाकण्यामागे तांत्रिक कारण सांगितले.
"मला असे वाटते की मी थोड्या उशीराने जंप करत आहे. क्रीझच्या आधी मी चांगली उडी मारली पाहिजे पण मला असे वाटते की मी थोडा उशीरा उडी घेत आहे. म्हणूनच समस्या होत आहे. शुक्रवारी ते अधिक होते; आज ते थोडे कमी होते. नेटमध्येही यावर काम करण्याचे मी ठरवित आहे," एम. ए चिदंबरम स्टेडियमवर दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या नंतर नदीम म्हणाला. नदीमने सर्वाधिक लुटवल्या असल्या तरी शनिवारी इंग्लंड कर्णधार जो रुटची द्विशतकी खेळी संपुष्टात आणली. रूटने 218 धावा ठोकल्या आणि पुढाकार घेत संघाचे नेतृत्व केले.