IND vs ENG 1st Test 2021: टीम इंडिया (Team India) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि DRS यांच्यातील 36 चा आकडा इंग्लंडविरुद्धही दिसला. चेन्नई (Chennai) येथे सुरु असलेल्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात इंग्लंड कर्णधार जो रूट (Joe Root) आणि बेन स्टोक्स (Ben Stokes) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर संघाची धावसंख्या 400 पार गेली. रूट आणि इंग्लंड फलंदाज चेन्नईच्या खेळपट्टीवर वर्चस्व गाजवत त्यांची भारतापुढे मोठी धावसंख्येच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. पहिल्या सत्रात रूटला अष्टपैलु स्टोक्सची साठी मिळाली. रूटने 150 तर स्टोक्सने अर्धशतकी धावसंख्या गाठली. भारतीय गोलंदाज विकेट घेण्यासाठी संघर्ष करताना फिल्डर्सकडून त्यानं योग्य ती साथ मिळाली नाही. खेळपट्टीच्या लक्षणीय असहाय स्वभावाने बांधलेले भारतीय गोलंदाज संपूर्ण खेळात विकेट घेण्याची पुरेशी संधी निर्माण करण्यात अपयशी ठरले आणि स्थिती आणखी खराब करत पहिले सत्र संपण्यापूर्वी भारताने दोन रिव्यूही गमावले. (IND vs ENG 1st Test 2021: Joe Root याचा डबल ब्लास्ट, भारताविरुद्ध दुहेरी शतक ठोकत रचला इतिहास)
रविचंद्रन अश्विन आणि शाहबाझ नदीम यांच्या ऑफ-साईड चेंडूंवर भारताने दोन रिव्यू गमावले. डावाच्या 108व्या ओव्हरमध्ये पहिला रिव्यू घेण्यात आला जेव्हा अश्विन आणि कोहलीने असा विश्वास धरला की, बेन स्टोक्स रिव्हर्स-स्वीप शॉटचा प्रयत्नात एलबीडब्ल्यू आऊट झाला. तथापि, रीप्लेमध्ये चेंडू स्टोक्सच्या ग्लोव्हजला लागल्याचे दिसून आले. पुढच्या DRS मध्ये शहबाज नदीमच्या चेंडूवर बचावात्मक स्ट्रोक खेळण्यासाठी जो रूट क्रीजच्या बाहेर पडला पण चेंडूची लाईन चुकली. चेंडू त्याच्या डाव्या पॅडवर बसला आणि कोहलीने पुन्हा डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. तथापि, बॉल-ट्रॅकिंग अॅनिमेशनमध्ये चेंडू थेट स्टंपच्या वरून जात असतानाचे दिसून आले. कोहली टीम इंडियाचा कर्णधार म्हणून त्याच्या संपूर्ण काळात त्याच्या DRS निर्णयाबाबत सुसंगत असल्याचं दिसून आलं आहे. 2018 मधील एका आकडेवारीनुसार कोहलीने भारताच्या इंग्लंड दौर्यापर्यंत 93 रिव्यू घेतले आहेत, त्यापैकी 68 गमावले आहेत. चाहत्यांनी यावर दिलेली प्रतिक्रिया येथे पहा:
विराटच्या DRS वर टीम इंडिया
Team India after Kohli took wrong DRS#INDvsENG pic.twitter.com/Pzhc8WrAKy
— घा स ले ट (@GhasIate) February 6, 2021
पिकासो कोहली
If losing DRS is an art, Kohli is Picasso..
— Writer Thakur (@WriterThakur) February 6, 2021
खराब DRS घेण्याबाबत स्पष्टीकरण देताना विराट कोहली
Virat Kohli explaining why he takes bad DRS reviews:#INDvENG #INDvsENG_2021 pic.twitter.com/UkcFaNaT51
— lemony (@SomewhereNowhe8) February 6, 2021
विराटच्या चुकीच्या DRS नंतर भारतीय चाहते
Indian fans after Virat took wrong DRS#INDvENG pic.twitter.com/VBXRVJIPxL
— Sir-Kid (@ooobhaishab) February 6, 2021
कोहलीचे काम DRS व्यर्थ करणे
Naam Virat Kohli
Kaam DRS waste krna
Naam Aakash Chopra
Kaam Middle Name rakhna
'Joe atoot root'#INDvsENG #ViratKohli #aakashChopra
— Hrithik Agarwal (@ObserverGuy_HRK) February 6, 2021
खराब DRS निर्णय
Kohli back in captain's seat and so are the poor DRS calls. 😓😓 #INDvsENG
— Mandar (@Maddy_CFC) February 6, 2021
DRS वर विराट
Kohli to DRS #ViratKohli #INDvsENG pic.twitter.com/hiPbxeVW0X
— RKT (@rakeshfit) February 6, 2021
विराटला DRS घेताना पाहताना भारतीय चाहते
* Indian audience after watching kohli taking DRS * #INDvsENG pic.twitter.com/FBeszunmtY
— Hunटरर ♂🥳 (@nickhunterr) February 6, 2021
यापूर्वी चेन्नई कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. डोमिनिक सिब्लीने कसोटीच्या पहिल्या दिवशी 89 धावा केल्या तर स्टोक्सने दुसर्या दिवशी 82 धावांवर बाद झाला. भारताकडून जसप्रीत बुमराहला 2 तर अश्विन आणि नदीमला प्रत्येकी 1 विकेट मिळाली.