भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे (Photo Credit: PTI)

IND vs ENG Series 2021: टीम इंडियाचा (Team India) मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) जोरदार धावांचा पाऊस पाडत आहे. राजस्थानविरुद्ध (Rajasthan) खेळल्या गेलेल्या सामन्यात अय्यरने केवळ 103 चेंडूंत 116 धावांची तुफान फलंदाजी केली. मुंबई (Mumbai) संघाचा कर्णधार अय्यरचे तिसर्‍या सामन्यातील हे सलग दुसरे शतक आहे. विजय हजारे ट्रॉफीमधील श्रेयसच्या शानदार खेळीच्या जोरावर मुंबईने पहिले फलंदाजी करत 7 विकेट गमावून 317 धावा केल्या. अय्यरने आपल्या खेळीत 11 चौकार आणि तीन उतुंग षटकार ठोकले आणि केवळ 14 चेंडूत 62 धावा फटकावल्या. अय्यरव्यतिरिक्त पृथ्वी शॉ देखील चांगल्या लयीत दिसला आणि 30 चेंडूत 36 धावा फटकावल्या. 318 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान संघ 250 धावांपर्यंत मजल मारू शकला. मुंबईसाठी शार्दुल ठाकूरने 50 धावा देत चार विकेट घेतल्या. (India Vs England ODI Series 2021: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिका प्रेक्षकांविना खेळली जाणार)

इंग्लंडविरुद्ध पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेअशी श्रेयस अय्यरची संघात निवड झाली आहे. अय्यर ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर फॉर्मशी संघर्ष करताना दिसत होता आणि छोट्या गोलंदाजीने त्याला खूप त्रास दिला. दुसरीकडे, मागील तीन सामन्यात दुहेरी धावसंख्या गाठण्यात अपयशी ठरत असलेल्या शिखर धवनने (Shikhar Dhawan) विजय हजारे ट्रॉफीच्या एलिट ग्रुप डी सामन्यात 118 चेंडूत 153 धावांची खेळी करत दिल्ली संघाला चार चेंडू शिल्लक असताना तीन विकेट्सने विजय मिळवून दिला. या खेळीसह डावखुऱ्या फलंदाजाने इंग्लंडविरुद्ध मर्यादित ओव्हरच्या मालिकेपूर्वी लयीत परतण्याचे संकेत दिले. धवनने आपल्या खेळीत 21 चौकार आणि एक षटकारही लगावला. श्रेयस आणि धवनच्या या कामगिरीने टी-20 मालिकेपूर्वी इंग्लंडला धोक्याचा इशारा दिला आहे.

दुसरीकडे, इंग्लंडच्या भारत दौऱ्यावरील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला 12 मार्चपासून अहमदाबादमध्ये सुरुवात होणार आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर धवन आणि अय्यरला अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नाही मात्र, घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध मालिकेपूर्वी पूर्ण फॉर्म मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.