IND vs ENG Series 2021: रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, शार्दुल ठाकूर चेन्नईला दाखल, इंग्लंडविरुद्ध टेस्ट सिरीजपूर्वी इतके दिवस करू शकणार ट्रेनिंग
अजिंक्य रहाणे, शार्दूल ठाकूर आणि रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

IND vs ENG Series 2021: ऑस्ट्रेलिया संघावर त्यांच्याच घरी कसोटी मालिकेत 2-1 अशी मात केल्यानंतर भारतीय संघ (Indian Team) आता आपल्या नवीन मोहिमेवर आला आहे, जिथे त्यांचे लक्ष इंग्लंडविरुद्ध (England) घरच्या मैदानावर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत वर्चस्व गाजवण्यावर असेल. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेचे पहिले दोन सामने चेन्नई येथील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium) खेळले जातील. या कारणास्तव भारतीय संघाचे काही मोठे खेळाडू चेन्नईला पोहोचले आहेत, येथे त्यांना 6 दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे. तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्याने PTIला दिलेल्या माहितीनुसार हॉटेल लीला पॅलेसमध्ये दोन्ही संघांच्या खेळाडूंना क्वारंटाइन केले जाईल. भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane), अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) मंगळवारी मुंबईहून चेन्नईला पोचले आहेत. खेळाडूंना मालिकेच्या सुरुवातीच्या सामन्यापूर्वी 6 दिवसांच्या क्वारंटाइनमुळे फक्त तीन दिवस सरावाला मिळणार आहे. (IND vs ENG Test Series 2021: आर अश्विन याचं चेतेश्वर पुजाराला खुलं चॅलेंज, म्हणाला-'इंग्लंडविरुद्ध मालिकेत असे केल्यास माझी अर्धी मिशी उडवून टाकेन')

संघाच्या स्थानिक संपर्क अधिकाऱ्यावर रोहित, शार्दुल आणि रहाणे मंगळवारी चेन्नईला पोहोचले तर संघातील अन्य सदस्यांनी वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये पोचणे अपेक्षित आहे. टीम इंडिया कर्णधार विराट कोहली बुधवारी दाखल होणार आहे, तर देशाच्या विविध भागातील अन्य खेळाडूंनीही एक-दोन दिवसात पोहचणे अपेक्षित आहे. इंग्लंड क्रिकेट संघाचे खेळाडूही बॅचमध्ये दाखल होत आहेत. बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि मोईन अलीसह काही शीर्ष स्टार खेळाडू आधीच पोहचले आहे, इतर खेळाडू बुधवारी पोहचतील. दरम्यान, PTI ला दिलेल्या माहितीनुसार दोन्ही संघ 2 फेब्रुवारी रोजी सरावाला सुरुवात करतील. "दोन्ही संघातील सदस्यांना सामनाधिकारी यांच्यासह हॉटेल लीला पॅलेसमध्ये ठेवले जाईल. ते सहा दिवस वेगळे राहतील आणि 2 फेब्रुवारीपासून सराव सुरू होण्याची शक्यता आहे," अधिकाऱ्याने सांगितले.

श्रीलंकाविरुद्ध 2-0 विजयाने इंग्लंडचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला असेल. दुसरीकडे, टीम इंडिया ऑस्ट्रेलियाचा 2-1 अशा विजयी दौर्‍यानंतर मैदानावर उतरेल. एम ए चिदंबरम स्टेडियमवर पहिला कसोटी सामना 5 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. दुसरा सामनाही याच ठिकाणी 13 फेब्रुवारीपासून खेळला जाईल.