IND vs ENG, ICC CWC 2019: इंग्लंड विरुद्ध विराट कोहली ने मैदानावरच केला 'रोबोटिक डान्स', पहा हा मजेदार व्हिडिओ
(Photo Credits: Twitter)

आयसीसी (ICC) विश्वकपच्या 38 व्या सामन्यात इंग्लंड (England) संघाने दिलेल्या 338 धावांच्या लक्ष्यांचे लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी टीम इंडिया (Team India) मैदानात उतरली आहे. सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) च्या तुफान फटकेबाजी च्या जोरावर भारताने 200 धावा पूर्ण केल्या आहेत. रोहित शर्मा 102 धावा करत बाद झाला तर कोहलीने 66धावा केल्या. पण सध्या कर्णधार विराट कोहली फिल्डिंग करतानाच एक विडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. (IND vs ENG, ICC World Cup 2019: इंग्लंड विरुद्ध विराट कोहली-रोहित शर्मा च्या जोडीने केली सचिन-सेहवागची बरोबरी, बनवला हा अद्भुत रेकॉर्ड)

इंग्लंडच्या फलंदाजी दरम्यान भारतीय संघ गोलांधळून गेला होता की त्यांनी डीआरएस घ्यावी कि नये. ही घटना घडली जेव्हा जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) हार्दिक पांड्या (Hardi Pandya) च्या चेंडूवर ब्रिज शॉट घेवू इच्छित होता परंतु चेंडू थेट धोनी (MS Dhoni) च्या ग्लोव्हज मध्ये गेला. भारतीय खेळाडूंनी जोरदार अपील केले आहे परंतु अंपायरनी बेअरस्टोला नॉट आऊट दिले. यानंतर कोहलीला ही शंका झाली की बॅटच्या किनाऱ्यावर चेंडू लागला तर नाही. शेवटी कोहलीने रिव्हयू केले नाही, परंतु आपल्या रोबोटिक डान्स ने फलंदाजाला घाबरवण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, इंग्लंडसाठी बेअरस्टो ने 111 धावांची खेळी केली. त्याला साथ देत जेसन रॉय (Jason Roy) ने 66 आणि बेन स्टोक्स (Ben Stokes) ने 79 धावा केल्या. दुसरीकडे, भारतासाठी मोहम्मद शमी ने 5 विकेट्स घेतल्या. तर कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह ने 1-1 गडी बाद केले.