(Photo Credit: Getty Image)

आयसीसी (ICC) विश्वकपमध्ये भारत (India) आणि यजमान इंग्लंड (England) यांच्यातील लढतीत टॉस जिंकून इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन (Eoin Morgan) ने पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडची सलामी जोडी जेसन रॉय (Jason Roy) आणि जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) ने तुफानी खेळी करत 50 षटकात 337 धावा केल्या. इंग्लंडने दिलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडिया ला 306 एवढीच मजल मारता आली. (IND vs ENG, ICC World Cup 2019: इंग्लंड विरुद्ध विराट कोहली-रोहित शर्मा च्या जोडीने केली सचिन-सेहवागची बरोबरी, बनवला हा अद्भुत रेकॉर्ड)

इंग्लंडने दिलेल्या 338 ध्वनीचा पाठलाग करत दुसऱ्याच ओव्हरमध्ये ख्रिस वोक्स (Chris Woakes) ने भारताला मोठा धक्का दिला. सलामीवीर के. एल राहुल (KL Rahul) एकही धाव न करता बाद झाला. मात्र, रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांनी 138 धावांची भागिदारी करत भारताचा डाव सावरला. विराटने अर्धशतक केलं आणि तो 66 धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहितने शतक साजरं केलं आणि लगेच व्होक्सच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. त्यानंतर विश्वकपमध्ये पहिला सामना खेळणारा रिषभ पंत (Rishabh Pant) 32 धावांवर बाद झाला. यंदाच्या सामन्यातही एम एस धोनी (MS Dhoni) पुन्हा संथ खेळी केली. धोनी इंग्लंडच्या गोलंदाजीवर धावांसाठी धडपडताना दिसत होता. धोनीने 31 चेंडूत 47 धावा केल्या.

याआधी, इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर आपले वर्चस्व राखले. रॉय आणि बेअरस्टोने पहिल्या विकेटसाठी १६० धावांची भागीदारी केली. मात्र, कुलदीप यादव ने भारताला पहिले यश मिळवून देत रॉयला 66 धावांवर बाद केले. सलामीला आलेला बेअरस्टो १११ धावांवर बाद झाला. त्यानंतर जो रूट आणि बेन स्टोक यांनी चौथ्या विकेटसाठी चांगली फलंदाजी केली. मात्र, मोहम्मद शमी ने पुन्हा एकदा इंग्लंडला रूटच्या रूपात एक झटका दिला. रूट 44 धावांवर बाद झाला. त्याच्यामागे जोस बटलर ही 20 धावांवर बाद झाला. शमी ने विश्वकपमध्ये पहिल्यांदा 5 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे.