IND vs ENG 4th Test 2021: Rohit Sharma याने विचारले- 'विकेटच्या मागे का इतकी बडबड करतो?' Rishabh Pant याने दिले मन जिंकणारे उत्तर (Watch Video)
रिषभ पंत आणि रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test 2021: शुक्रवारी भारताचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतने (Rishabh Pant) कठीण परिस्थितीत इंग्लंडविरुद्ध (England) शतक ठोकून संघाला मजबूत स्थितीत आणले आहे. पंत जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा संघ 80 धावांवर चार विकेट गमावून संघर्ष करत होता. सातव्या विकेटसाठी ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याच्याबरोबर त्याच्या शतकी भागीदारीने भारताला (India) पहिल्या डावात आघाडीवर नेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सामन्यानंतर रोहित शर्माने (Rohit Sharma) दोन्ही क्रिकेटर्सशी मुलाखत घेतली. या दरम्यान, रोहितने पंतला कदाचित प्रत्येकी चाहत्यांच्या मनातील प्रश्न विचारला ज्याच्यावर युवा विकेटकीपरनेही मन जिंकणारे उत्तर दिले. रोहितने पंतला विचारले की अखेर स्टम्पच्या मागे तो इतकी का बडबड करतो? यावर पंतच्या उत्तराने बर्‍याच लोकांची मने जिंकली आहेत. पंत विकेटच्या मागे काहीतरी सतत बोलत राहतो. बर्‍याचदा त्याचे काही व्हिडिओ व्हायरल देखील होतात ज्यात तो विकेटकीपिंग करताना सहखेळाडूंचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करतो. (IND vs ENG 4th Test 2021: Rishabh Pant याने ठोकले खणखणीत शतक, ड्रेसिंग रूममधून धावून येत Virat Kohli ने दिली सर्वांचं मन जिंकणारी रिअक्शन)

यावर पंत म्हणाला, “मला माझा खेळ खेळायला आवडतो. असे केल्याने, संघाची उर्जा कायम राहते. मला संघाला एखाद्या प्रकारे मदत मिळावी अशी इच्छा आहे, हेच माझ्या मनात कायम आहे.” सामना संपल्यानंतर पंत म्हणाला की माझी खेळण्याची शैलीच अशी आहे की मी परिस्थिती नुसार खेळतो आणि चेंडू पाहिल्यानंतर त्याच्या गुणवत्तेवर फटका मारतो. मला माझे क्रिकेट खेळायचे आहे आणि संघाला विजयी बनवायचे आहे. जर माझा डाव प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असेल तर तो माझा सर्वात मोठा आनंद आहे. पंतने रोहित शर्मासह 41 धावांची आणि नंतर वॉशिंग्टन सुंदरसह सातव्या विकेटसाठी 113 धावांची शतकी भागीदारी केली. पंतने 118 चेंडूंच्या खेळीत 13 चौकार आणि 2 षटकार लगावले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सुंदर 60 धावा करून खेळत होता.

सामन्यात 49 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळणार्‍या रोहितबरोबर फलंदाजी करण्याबाबत पंत म्हणाला, “जेव्हा मी आणि रोहित खेळत होतो तेव्हा आमची योजना भागीदारी बनवण्याची होती. खेळपट्टीवर काही काळानंतर सेट झाल्यावर मी माझा शॉट खेळण्याचा निर्णय घेतला. कधीकधी जेव्हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो तेव्हा आपल्याला त्याच्या चेंडूंचा आदर करावा लागतो. जर आपल्याला खराब बॉल आला तर, आपण त्यास मारू शकता. माझ्या मनातही तीच गोष्ट होती.”