रिषभ पंत आणि विराट कोहली (Photo Credit: Instagram)

IND vs ENG 4th Test Day 2: रिषभ पंतचे (Rishabh Pant) दमदार शतक आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर यजमान भारतीय संघाने (Indian Team) चौथ्या अहमदबाद टेस्टच्या (Ahmedabad Test) दुसऱ्या दिवसाखेर इंग्लंडवर दबदबा बनवला आणि 89 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 94 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 294 धावा केल्या आहेत. सध्या सुदंर 117 चेंडूत 60 धावा आणि अक्षर पटेल 34 चेंडूत 11 धावा करून खेळत होते. तसेच पंतने या डावात शतकी खेळी केली आहे. पंतने सलग चार वर्षानंतर शंभरी धावसंख्या पार केली आहे. पंतचे शतक वैयक्तिकच नव्हे तर संघासाठी देखील महत्वाची होते आणि याचा पुरावा संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) स्वतः दिला. पंतने 115 चेंडूंमध्ये हे शतक पूर्ण केलं आणि उत्साही विराटने ड्रेसिंग रूममधून बाहेर येत टाळ्या वाजवून पंतचे कौतुक केले. (IND vs ENG 4th Test Day 2: रिषभ पंतने घेतला इंग्लंडचा समाचार, दुसऱ्या दिवसाखेर टीम इंडियाचा स्कोर 294/7; इंग्लंडविरुद्ध 89 धावांची आघाडी)

भारतीय क्रिकेट बोर्डाने पंतच्या शतकी खेळीचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. विराटची प्रतिक्रिया नक्कीच सर्वांचं मन जिंकणारी होती. पंतने निर्णायक क्षणी शंभरी धावसंख्या गाठली. टीम इंडियाने 121 धावांवर 5 विकेट गमावले असताना पंत फलंदाजीला आला. अशास्थितीत, संघ अडचणीत असताना पंत टीम इंडियाच्या मदतीला धावून आला मात्र, शतक पूर्ण केल्यानंतर लगेचच जेम्स अँडरसनच्या चेंडूवर बाद झाला. त्याने 118 चेंडूत 101 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 13 चौकार आणि 2 षटकार मारले. पंतने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर तिसऱ्या सत्रात धावांचा वेग वाढवत आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. तसेच त्याने या अर्धशतकादरम्यान काही शानदार फटकेही लगावले. पंत गेल्या काही काळापासून सातत्याने चांगली खेळी करत आहे. पहा पंतच्या शतकी खेळीचा हा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Team India (@indiancricketteam)

दरम्यान, चौथ्या भारत-इंग्लंड कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा  खेळ संपला आहे. अहमदाबाद येथे सामन्याच्या दुसर्‍या दिवसाखेर भारताने पहिल्या डावात 7 विकेट गमावून 294 धावा केल्या ज्यामुळे त्यांना 89 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली आहे. पंतव्यतिरिक्त सुंदरनेही नाबाद 60 केल्या आहेत. या दोघांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडिया 300 धावांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. दुसऱ्या दिवसखेर सुंदर आणि अक्षर पटेल नाबाद परतले असून तिसऱ्या दिवशी मोठी आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा निर्धार असेल.