IND vs ENG 4th Test 2021: अहमदाबादच्या (Ahmedabad) नवनिर्मित नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत (India) आणि इंग्लंड (England) संघातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचा अंतिम सामना रंगणार आहे. याच स्टेडियमवर गुलाबी चेंडूने दिवस/रात्र सामना खेळला गेला ज्यात यजमान संघाने अवघ्या दोन दिवसात विजय मिळवला. टीम इंडियाचे (Team India) फिरकीपटू आणि रोहित शर्माला वगळता सामन्यात अन्य खेळाडू प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले. रोहितने पहिल्या डावात फलंदाजी करत 66 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यापूर्वी, अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विनने इंग्लिश फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आणि स्वस्तात माघारी धाडलं तर दुसऱ्या डावातही त्यांच्या फिरकीने इंग्लंडवर वर्चस्व गाजवलं आणि संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. आता चौथ्या सामन्यासाठी यजमान टीम इंडिया (Team India) आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही मोठा बदल करू शकते जो खालीलप्रमाणे आहे. (IND vs ENG 4th Test 2021: अहमदाबादमध्ये Axar Patel याला इतिहास घडवण्याची सुवर्ण संधी, हरभजन सिंहचा ‘हा’ मोठा रेकॉर्ड असेल निशाण्यावर)
तिसर्या कसोटी सामन्यात अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला कुलदीप यादवच्या जागी टीम इंडियामध्ये संधी मिळाली होतु, परंतु या संधीचा त्याला फायदा घेता आला नाही आणि फलंदाजीत भोपळा न फोडता माघारी परतला. शिवाय, त्याला तिसऱ्या सामन्यात गोलंदाजी करण्याचीही अधिक संधी मिळाली नाही. शिवाय, अहमदाबादची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त ठरत असल्याने कर्णधार विराट कोहली पुन्हा चौथ्या कसोटी सामन्यात कुलदीपचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करू शकतो. दुसरीकडे, युवा फलंदाज शुभमन गिल बॅटने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध काही खास कामगिरी करू शकलेला नाही. या कसोटी मालिकेच्या त्याने आतापर्यंत सहा डावात 119 धावा केल्या आहेत. अशास्थितीत कर्णधार कोहली चौथ्या कसोटी सामन्यात गिलच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये मर्यादित षटकांच्या विश्वसनीय फलंदाज केएल राहुलला संधी देऊ शकतो. दोन्ही संघांदरम्यान सुरु असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे.
पहा टीम इंडियाचा संभावित प्लेइंग इलेव्हन: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव.