IND vs ENG 4th Test 2021: अहमदाबादमध्ये Axar Patel याला इतिहास घडवण्याची सुवर्ण संधी, हरभजन सिंहचा ‘हा’ मोठा रेकॉर्ड असेल निशाण्यावर
अक्षर पटेल (Photo Credit: Instagram)

IND vs ENG 4th Test 2021: अहमदाबाद (Ahmedabad) येथील चौथा कसोटी सामना लोकल बॉय अक्षर पटेल (Axar Patel) याच्यासाठी स्पेशल सिद्ध होऊ शकतो. इंग्लंडविरुद्ध (England) या सामन्यात डावखुरा भारतीय (India) फिरकी गोलंदाज अक्षर भारताकडून टेस्ट क्रिकेट हरभजन सिंहच्या (Harbhajan Singh) खास विश्वविक्रमाची बरोबरी करू शकतो. अक्षरने सलग 3 कसोटी डावात 5 विकेट घेतल्या आहेत तर आता चौथ्या कसोटी सामन्यात त्याच्या निशाण्यावर हरभजन सिंहच्या सलग चार 5 विकेटच्या विक्रमवीर लक्ष असेल. सध्या सुरू असलेल्या इंग्लंड मालिकेच्या चेन्नई येथे दुसर्‍या कसोटी सामन्यात पदार्पण केल्यापासून अक्षरने डेब्यू डावात 2/40 आणि दुसऱ्या डावात 5/60 संख्या नोंदवली होती. त्यांनतर, घरच्या मैदानावर खेळत पटेलने इंग्लिश टीमच्या नाकीनऊ आणले आणि त्यांना गुडघे टेकण्यास भाग पाडले. तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याच्या फिरकीपुढे निरुत्तर ठरले असून त्याने पहिल्या डावात 38 धावांवर 6 विकेट आणि दुसऱ्या डावात 32 धावांवर 5 विकेट घेतल्या आहेत. (IND vs ENG 3rd D/N Test: Joe Root याचा अडथळा दूर करत पिंक-बॉल सामन्यात अक्षर पटेलचा भीम पराक्रम, Ashwin याचा '400 कसोटी' विकेट क्लबमध्ये समावेश)

अशा प्रकारे, त्याने चेन्नईतील सलग तिसर्‍या डावात पाच विकेटची नोंद केली आणि अहमदाबाद कसोटी सामन्यात 70 धावांवर एकूण 11 विकेट घेतल्या. असे करत तो कसोटी क्रिकेटमध्ये सलग तीन वेळा पाच विकेट घेणारा फक्त चौथा भारतीय गोलंदाज ठरला. या लिस्टमध्ये सर्वात पहिले नाव हरभजन सिंहचे आहे. 2001 ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यावर भज्जीने स्टीव्ह वाघच्या संघाला संघाला संघर्ष करावा लावला होता. त्या मालिकेत सिंहने चार डावात 28 विकेट्स मिळवल्या होत्या ज्यात सलग 4 वेळा 5 विकेटचाही समावेश होता. अशा प्रकारे चार वेळा पाच कसोटी विकेट घेणारा एकमेव भारतीय गोलंदाज ठरला. यानंतर फिरकीपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी 1984-85मध्ये इंग्लंडविरुद्ध 3 वेळा पाच विकेट घेतल्या आहेत. जावगल श्रीनाथ यांनी देखील 1999 पाकिस्तानविरुद्ध मालिकेत सलग तीन 5 विकेट हॉल घेतल्या होत्या.

1888 मध्ये इंग्लंडविरुद्ध सलग सहा विकेट्ससह ऑस्ट्रेलियाचा चार्ली टर्नर यांनी यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. त्यांच्यानंतर इंग्लंडचा टॉम रिचर्डसन आणि अ‍ॅलेक बेडर हे सलग पाच फिफरसह दुसऱ्या स्थानावर आहेत. वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज शेन शिलिंगफोर्ड यांनी झिम्बाब्वे आणि भारताविरुद्ध 2013 मध्ये पाच बॅक टू बॅक फिफर्ससह एकमेव फिरकी गोलंदाज आणि आधुनिक काळातील गोलंदाज आहेत.