IND vs ENG 3rd D/N Test: डावखुरा ऑर्थोडॉक्स फिरकीपटू अक्षर पटेलचा (Axar Patel) इंग्लडनेवविरुद्ध (England) जलवा सुरूच आहे. भारत आणि इंग्लंड संघात गुलाबी चेंडूने खेळला जात असलेला दिवस/रात्र सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लिश कर्णधार जो रूटचा (Joe Root) अढथळा दूर करत लोकल बॉय अक्षरने आपल्या दुसऱ्याच सामन्यात 10 विकेट घेण्याचा पराक्रम केला. 27 वर्षीय पटेल हा कारनामा करताच दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवले. भारतीय डावखुरा फिरकीपटू कसोटी इतिहासात हा मैलाचा दगड पार कारण फक्त चौथा फिरकीपटू ठरला. इतकंच नाही तर अक्षरचा फिरकी साथीदार रविचंद्रन अश्विनसाठी (Ravichandran Ashwin) देखील अहमदाबाद येथील सामना खास ठरला. इंग्लिश टीमच्या दुसऱ्या डावात जोफ्रा आर्चरला बाद करत अश्विन भारतीय गोलंदाजांच्या 400 कसोटी विकेट क्लबमध्ये सामील झाला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये हा टप्पा सर करणारा अश्विन चौथा गोलंदाज ठरला. अश्विनपूर्वी कपिल देव, अनिल कुंबळे आणि हरभजन सिंह यांनी देखील हा टप्पा पार केला आहे. (IND vs ENG 3rd D/N Test: जो रुट याच्या भेदक गोलंदाजीपुढे टीम इंडियाला फुटला घाम; टेस्ट सामन्यांमध्ये जबरदस्त खेळी, मोडले अनेक रेकॉर्ड)
भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांबद्दल बोलायचे तर या एलिट यादीत अनिल कुंबळेचे नाव आघाडीवर आहे. कुंबळे 619 विकेट घेतल्या आहेत तर माजी कर्णधार कपिल देव यांनी 434 टेस्ट विकेट्स आणि हरभजन सिंहने 417 विकेट घेतलेल्या आहेत. अश्विनया यादीत सामील होणारा नवीन गोलंदाज असून त्याच्या मागे ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नॅथन लायन आहे ज्याने 399 कसोटी विकेट घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत महान श्रीलंकन फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन पहिल्या स्थानावर विराजमान आहेत. मुथय्या मुरलीधरनच्या नावावर सर्वाधिक 800 टेस्ट विकेट्स आहेत.
दुसरीकडे, इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात 38 धावांवर 6 विकेट घेणाऱ्या अक्षरने इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील आपल्या पहिल्याच चेंडूवर झॅक क्रॉलीला शून्यावर बाद केले आणि कसोटी सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या एलिट यादीत स्थान पटकावले. पटेल कसोटी इतिहासात ही कामगिरी करणारा फक्त चौथा फिरकीपटू ठरला. इंग्लंडचे बॉबी पील आणि दक्षिण आफ्रिकेचे बर्ट व्होगलर युद्धातील पूर्व युगात ही कामगिरी करणाऱ्या यादीतील पहिले दोन फिरकीपटू आहेत. दरम्यान, युद्धानंतरच्या युगात भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि पटेल या दोनच फिरकीपटूंची नावे या यादीत आहेत.