
IND vs ENG 3rd D/N Test: अहमदाबादच्या (Ahmedabad) मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर तिसऱ्या पिंक-बॉल टेस्ट (Pink-Ball Test) सामन्यात इंग्लंडने (England) पहिल्या डावात केलेल्या 112 धावांच्या प्रत्युत्तरात यजमान टीम इंडिया (Team India) 145 धावांपर्यंतच मारू शकले आणि 33 धावांची आघाडी घेतली. इंग्लंड कडून कर्णधार जो रूट (Joe Root) याने यजमान भारतीय संघाला (Indian tTeam) मोठे धक्के दिले आणि फिरकी गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर कमाल केली. रूटने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गोलंदाजीची सूत्रे आपल्या हाती घेतली. रूटने एकही धाव न देता पहिल्या तीन विकेट घेतल्या आणि भारताच्या फळीला स्वस्तात माघारी पाठवलं. 3 बाद 114 धावांवरून टीम इंडियाची 145 धावांवर घसरगुंडी उडाली. भारताने अखेरच्या 7 विकेट्स अवघ्या 46 धावांवर गमावल्या. टीम इंडियाने 99/3 धावसंख्येपासून दुसऱ्या दिवशी खेळाला सुरुवात केली मात्र, पहिल्या सत्रातच इंग्लिश फिरकी गोलंदाजांनी भारतीय संघाला स्वस्तात बाद केलं. (IND vs ENG 3rd D/N Test: इंग्लंडच्या फिरकीत अडकली टीम इंडिया, पिंक-बॉलच्या पहिल्या डावात भारत 145 धावांवर तंबूत, 33 धावांची घेतली आघाडी)
गुरुवारी रूटने अहमदाबाद येथे भारत विरुद्ध पिंक-बॉल टेस्टच्या दुसर्या दिवशी कसोटी इतिहासातील स्पिनरकडून सर्वाधिक किफायतशीर गोलंदाजी करत पाच विकेट घेत इतिहास रचला. रूटने 8 धावांवर 5 विकेट घेतल्या आणि अनेक कीर्तिमान केले. 1981 मध्ये एजबॅस्टन येथे इयान बोथमच्या 11 धावांत 5 बादच्या सर्वोत्तम कामगिरीला मागे टाकत इंग्लंडसाठी सर्वोत्तम गोलंदाजी आकडेवारीची नोंद केली आहे. शिवाय, 1983मध्ये बॉब विलिसनंतर कसोटी सामन्यात पाच विकेट्स मिळविणारा इंग्लंडचा पहिला कर्णधारही ठरला. त्याने आपल्या शॉर्ट स्पेलमध्ये 3 मेडन ओव्हर टाकल्या आणि भारतीय संघाचा डाव दुसर्या दिवशी पहिल्या सत्रात 99 धावांवर 3 विकेटपासून 145 धावांवर आटोपला. रूटने 6.2 ओव्हरमधील आपल्या रेकॉर्ड-ब्रेक कामगिरी दरम्यान रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह यांना स्वस्तात माघारी पाठवलं. पहिल्या दिवसाच्या पहिल्या डावात 112 धावांवर बाद झालेला इंग्लंड संघ आता भारताविरुद्ध 33 धावांच्या पिछाडीसह फलंदाजीला उतरेल.
दरम्यान, इंग्लंडकडून रूटव्यतिरिक्त जॅक लीचने 4 आणि जोफ्रा आर्चरला एका भारतीय फलंदाजाला माघारी पाठवत रुटला चांगली साथ दिली. दुसरीकडे, यापूर्वी रूट फलंदाजीने मात्र काही खास प्रभावी खेळी करू शकला नाही आणि 17 धावा करून बाद झाला.