IND vs ENG 3rd ODI: शार्दुल ठाकूरने ठोकला शानदार षटकार, पाहून थक्क झालेल्या Ben Stokes ने चेक केली बॅट, पहा मजेशीर Video
बेन स्टोक्सने चेक केली शार्दूल ठाकूरची बॅट (Photo Credit: Twitter)

IND vs ENG 3rd ODI: भारतीय क्रिकेटपटू शार्दुल ठाकूरची (Shardul Thakur) गणना गोलंदाजांमध्ये केली जाते पण इंग्लंडविरुद्ध (England) तिसर्‍या वनडे सामन्यात त्याला एक वेगळेच रूप पाहायला मिळाले. या सामन्यात शार्दुलने आपल्या वनडे कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट वैयक्तिक धावाच केल्या नाही तर मार्क वूड, रीस टोपेली आणि बेन स्टोक्सच्या (Ben Stoeks) चेंडूंवर षटकारही ठोकले. जेव्हा जगातील अव्वल अष्टपैलू स्टोक्सच्या गोलंदाजीवर शार्दूलने खणखणीत षटकार लगावला तेव्हा इंग्लंड गोलंदाजी स्वत: शार्दुलची बॅट तपासण्यासाठी पोहोचला. यादरम्यान दोघांच्याही चेहऱ्यावर हसू फुलले. या सामन्यात शार्दुलने 21 चेंडूंचा सामना केला आणि 30 धावा केल्या ज्यामध्ये एक चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. सामन्यात आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या शार्दूलने स्टोक्सच्या डावातील 45व्या ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर लाँग ऑफमध्ये षटकार ठोकला. (IND vs ENG 3rd ODI 2021: एक नंबर! Rishabh Pant ने एका हाताने खेचला षटकार, व्हिडिओ पाहून म्हणाल Wow!)

मुंबईकर शार्दुलने बाहेर जात असलेला स्लो चेंडूवर सरळ बॅटने एक जबरदस्त शॉट खेळला जो सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन पडला. यानंतर स्टोक्स हसून शार्दुलच्या बॅटकडे पाहू लागला. तत्पूर्वी, 14 एकदिवसीय सामन्यांत शार्दूलची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या नाबाद 22 धावा अशी होती. या सामन्यात त्याने रीस टोपेली आणि मार्क वूडच्या गोलंदाजीवरही षटकार ठोकले. वूडने त्याला बटलरच्या हाती झेल बाद केले आणि भारतच डाव 229 धावांवर संपुष्टात आणला. दरम्यान, इंग्लंडविरुद्ध तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजांनी चमकदार कामगिरी करत पुन्हा एकदा 300 हून अधिक धावांपर्यंत मजल मारली. भारतीय डाव 48.2 षटकांत 329 धावांवर मर्यादित होता. या सामन्यात इंग्लंडचा प्रभारी कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून पहिले क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

टीम इंडियासाठी रोहित शर्मा आणि शिखर धवनने शानदार सुरुवात करुन पहिल्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी केली. त्यानंतर यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतने त्याच्या वनडे कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट 78 धावा केल्या आणि हार्दिक पांड्यासोबत पाचव्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी केली. हार्दिकनेही 64 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. शार्दुलने 30 धावांचे योगदान दिले. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडने सर्वाधिक तीन गडी बाद केले.