IND vs ENG 3rd ODI 2021: एक नंबर! Rishabh Pant ने एका हाताने खेचला षटकार, व्हिडिओ पाहून म्हणाल Wow!
रिषभ पंतचा एकहाती षटकार (Photo Credit: Twitter)

IND vs ENG 3rd ODI 2021: इंग्लंड (England) संघाविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेच्या दुसया सामन्यात संधी मिळताच रिषभ पंतने (Rishabh Pant) जबरदस्त फलंदाजी करत आपली निवड योग्य सिद्ध केली. श्रेयस अय्यरला दुखापतीमुळे संघातील मधल्या फळीत पंतचा समावेश करण्यात आला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मागील वर्षी मुंबई वड्या सामन्यानंतर पहिल्यांदा पंतला संधी मिळाली. पहिल्या सामन्यातील 77 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर पंतने दुसऱ्या सामन्यासाठी देखील संघात आपले स्थान कायम ठेवले. इतकंच नाही तर संघाच्या आघाडीचे फलंदाज फ्लॉप ठरल्यावर पंतने गियर बदलला आणि एका हाताने जबरदस्त षटकार खेचला. पंतचा हा सिक्स पाहून इंग्लिश गोलंदाजच नाही तर सोशल मीडियावर यूजर्स देखील अवाक झाले आणि त्यांनी पंतवर कौतुकाचा वर्षाव केला. (IND vs ENG 3rd ODI 2021: कॅप्टन कोहली 200 नॉट आऊट! एमएस धोनी, मोहम्मद अझरुद्दीन यांच्यानंतर ठरला तिसरा भारतीय कर्णधार)

26 ओव्हरच्या पूर्वीच भारताने 4 गडी गमावले होते. अशास्थितीत, पंतने हार्दिक पांड्याच्या साथीने फटकेबाजीला सुरुवात केली आणि इंग्लंड गोलंदाजांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. चांगल्या सुरुवातीनंतर भारताच्या झटपट तीन विकेट्स गमावल्या असताना पंतने लियाम लिविंगस्टोनच्या (Liam Livingstone) ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर एकहाती षटकार खेचला. पंतने खेळलेला स्ट्रेट-ड्राइव्ह शॉट पाहून गोलंदाजही अवाक झाला आणि त्याला हसू फुटले. शिवाय, पंतने एक हाताने खेळलेला अविश्वसनीय षटकार पाहून भाष्यकार आणि सोशल मीडिया यूजर्स देखील चकित झाले. टीम इंडियाच्या मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून पंत शानदार फॉर्ममध्ये आहे. डाऊन अंडर दौऱ्यावर संघाला विजय मिळवून देण्यापासून इंग्लंडविरुद्ध कसोटी, टी-20 आणि आता वनडे मालिकेत पंतने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

पहा पंतच्या शानदार षटकारवर यूजर्सच्या प्रतिक्रिया:

पंत खूपच चांगला आहे!

अविश्वसनीय शक्ती!

पहाटेच्या व्यायामासाठी पंतचे शॉट्स चांगले आहेत!

पंत चौकार मारण्याच्या स्थितीत आला!

पंत-हार्दिकचे संभाषण 

एकेरी फलंदाज पंत

दरम्यान, अत्यंत चांगल्या सुरुवातीनंतर भारतीय संघाचा फलंदाजी क्रम घसरला आणि यजमान संघाने अवघ्या 157 धावांवर चार विकसित गमावल्या. अशास्थितीत, पंतने हार्दिक पांड्याच्या साथीने संघाचा डाव सावरत 99 धावांची भागीदारी केली. या दरम्यान पंतने षटकार खेचत स्टाईलमध्ये वनडे करिअरमधील तिसरे अर्धशतक देखील पूर्ण केले.