Virat Kohli 200th Captaincy Match: इंग्लंड (England) संघाविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यासाठी मैदानात उतरताच टीम इंडिया (Team India) कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohlil) कॅप्टन म्हणून आंतराष्ट्रीय दिग्गजांच्या यादीत मानाचे स्थान मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून विराटचा हा 200वा सामना आहे. कोहलीने सर्वप्रथम 2013 मध्ये भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोनशे किंवा अधिक सामन्यात संघाचे नेतृत्व करणारा विराट 9वा तर फक्त तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. विराटपुर्वी माजी भारतीय मोहम्मद अझहरुद्दीन (Mohammad Azharuddin) आणि एमएस धोनी (MS Dhoni) यांना या एलिट यादीत स्थान मिळवले आहे. अझहरुद्दीनने 221 तर धोनीने 332 सामन्यात टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवले आहे. विशेष म्हणजे धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा कर्णधार आहे. (IND vs ENG 3rd ODI 2021: इंग्लंडने जिंकला टॉस, पहिले गोलंदाजीचा घेतला निर्णय; तिसऱ्या वनडेसाठी असा आहे दोन्ही संघाचा प्लेइंग इलेव्हन)
ऑस्ट्रेलियाचा माजी वर्ल्ड कप विजेता कर्णधार रिकी पॉन्टिंग या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. पॉन्टिंगने 2002-2012 दरम्यान कांगारू संघाचे 324 सामन्यात नेतृत्व केले आहे. दरम्यान, भारत आणि इंग्लंड संघात आज तीन एकदिवसीय सामन्यांच्या वनडे मालिकेचा तिसरा आणि निर्णायक सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे मैदानावर खेळवला जाणार आहे. इंग्लंडने दुसरा एकदिवसीय सामना जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली त्यामुळे आजच्या सामन्यात विजयी संघ मालिकेत बाजी मारेल. अशास्थितीत दोन्ही संघ विजय मिळवण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही आणि चाहत्यांना रंगतदार सामना पाहायला मिळणार असे दिसत आहे. दरम्यान, आजच्या सामन्यासाठी इंग्लिश कर्णधार जोस बटलरने टॉस जिंकून टीम इंडियाला पहिले बॅटिंगसाठी बोलावले. दोन्ही संघाने आजच्या निर्णायक सामन्यासाठी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येकी एक बदल आहे.
टीम इंडियाने कुलदीप यादवला बाहेरचा रस्ता दाखवला असून त्याच्या जागी टी नटराजनला संधी दिली आहे तर टॉम कुरनच्या इंग्लंड संघात मार्क वूडचा समावेश झाला आहे. दोन्ही उभय देश सध्या तीन सामन्यांची मालिकेत 1-1 अशा बरोबरीत असल्यामुळे आजच्या सामन्यातील विजयी संघ मालिका देखील जिंकेल.