जोस बटलर आणि विराट कोहली(Photo Credit: PTI)

IND vs ENG 3rd ODI 2021: भारत (India) आणि इंग्लड (England) संघात आज वनडे मालिकेचा तिसरा व अखेरचा सामना रंगणार आहे. आजच्या सामन्यासाठी इंग्लंड संघाचा प्रभारी कर्णधार जोस बटलरने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल झाले आहेत. इंग्लंडसाठी मार्क वूडचे (Mark Wood) संघात पुनरागमन झाले आहे तर टॉम कुरनला डच्चू दिला आहे. दुसरीकडे, भारतीय इलेव्हनमधून कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) बाहेर केले असून टी नटराजनचा (T Natarajan) समावेश करण्यात आला आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत दोन्ही संघ सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे, त्यामुळे आजचा सामना जिंकून मालिका विजयी होण्याची दोन्ही संघांकडे अखेरची संधी असेल. विशेष म्हणजे यापूर्वी इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाने कसोटी आणि टी-20 मालिका जिंकली असल्याने एकदिवसीय सिरीज जिंकून भारत इंग्लिश टीमचा सफाया करू इच्छित असतील. (IND vs ENG 3rd ODI 2021: कॅप्टन कोहली 200 नॉट आऊट! एमएस धोनी, मोहम्मद अझरुद्दीन यांच्यानंतर ठरला तिसरा भारतीय कर्णधार)

टीम इंडियासाठी रोहित शर्मा-शिखर धवनची जोडी सलामीला उतरेल. यापूर्वी दोंघांना प्रभावी भागीदारी करता आली नसल्याने यंदा त्यांच्याकडून मोठी खेळीची अपेक्षा असेल. कर्णधार विराट कोहली, केएल राहुल आणि रिषभ आपला चांगला फॉर्म कायम ठेवू इच्छित असतील. विशेष म्हणजे मालिकेत सलग तिसरे अर्धशतक करण्याचा राहुलचा निर्धार असेल. गोलंदाजी विभागात संघाने काही बदल केले असल्यामुळे महागड्या कुलदीपला बाहेरचा रस्ता दाखवला असून त्याच्या जागी समावेश करण्यात आलेल्या टी नटराजनकडून प्रभावी बॉलिंगची संघाला अपेक्षा असेल. दुसरीकडे, इंग्लंड संघाचा फलंदाजी क्रम अधिक मजबूत झाला आहे. जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो संघाला आक्रमक सुरुवात करून देत असताना बेन स्टोक्स आणि मधल्या फळीत डेविड मलान व लियाम लिविंगस्टोनने अधिक बळ मिळवून दिले आहे. मार्क वूड यापूर्वी टी-20 मालिकेत प्रभावशाली राहिला होता त्यामुळे त्याच्या कमबॅकमुळे संघाची गोलंदाजी मजबूत झालेली दिसत आहे.

अशा आहे भारत-इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन

भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, शार्दूल ठाकूर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार आणि प्रसिद्ध कृष्णा.

इंग्लंड: जोस बटलर (कॅप्टन/विकेटकीपर), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, डेविड मलान, मोईन अली, सॅम कुरन, मार्क वूड, आदिल रशीद आणि रीस टोपली.