भारत आणि इंग्लड (IND Vs ENG) यांच्यातील तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन स्टेडिअमवर (Maharashtra Cricket Association Stadium) आज खेळण्यात येणार आहे. 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघाने 1-1 अशी बरोबरी केली आहे. यामुळे मालिका खिश्यात घालण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता सुरू होईल. तर, टॉस सामन्याच्या अर्धातास पूर्वी म्हणजेच दुपारी 1:00 वाजता होणार आहे. भारतीय प्रेक्षकांसाठी सामना टीव्हीवरील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह प्रसारित केला जाईल. याप6शिवाय, ऑनलाईन चाहते Disney+ Hotstar अॅप आणि वेबसाइट व Jio TV वर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीम पाहू शकतात.
जून 2019 नंतर पहिल्यांदाच दोन संघ एकदिवसीय सामन्यात आमने-सामने आले आहेत. दुसऱ्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाला 6 विकेट्सने पराभव पत्कारावा लागला आहे. मात्र, आजच्या सामन्यात दोन्ही संघ कोणत्या संयोजनासह मैदानात उतरतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या सामन्यात दोन्ही संघात बदल पाहायला मिळाला होता. आजच्या सामन्यातही काही बदल होतात का? हे नाणेफेक दरम्यानच समोर येईल. हे देखील वाचा- IND vs ENG 2nd ODI 2021: जॉनी बेअरस्टोने मोडला ‘विराट’ रेकॉर्ड, कुलदीप यादव ठरला महागडा, दुसऱ्या वनडे सामन्यात पडला विक्रमांचा पाऊस
संघ-
भारतीय एकदिवसीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, क्रुणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर.
इंग्लंडचा एकदिवसीय संघ: इयन मॉर्गन (कॅप्टन), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्ज, जोस बटलर, सॅम कुरन, टॉम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन, मॅट पार्किन्सन, आदिल रशीद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीस टोपली, मार्क वूड.