IND vs ENG 2nd ODI 2021: जॉनी बेअरस्टोने मोडला ‘विराट’ रेकॉर्ड, कुलदीप यादव ठरला महागडा, दुसऱ्या वनडे सामन्यात पडला विक्रमांचा पाऊस
जॉनी बेअरस्टो आणि केएल राहुल (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2nd ODI 2021: भारत (India) विरुद्ध इंग्लंड (England) यांच्यातील वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लिश टीमने 6 विकेट्सने विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 336 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात इंग्लंडने 43.3 ओव्हरमध्ये 6 विकेट्स राखून भारताचे भलेमोठे लक्ष्य गाठले. यजमान संघाने दिलेल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडसाठी जॉनी बेअरस्टोने (Jonny Bairstow) 124 धावांची शतकी खेळी केली तर बेन स्टोक्सचे (Ben Stokes) शतक अवघ्या एका धावेने हुकले. दुसरीकडे, यापूर्वी भारताकडून केएल राहुलने (KL Rahul) 108 धावा केल्या होत्या. तर रिषभ पंतने (Rishabh Pant) 77 आणि कर्णधार विराट कोहलीने 66 धावांच्या खेळीसह त्याला चांगली साथ दिली. दरम्यान, दोन्ही संघातील खेळाडूंनी आजच्या सामन्यात अनके विक्रमांची पाऊस पडला जे खेलीलप्रमाणे आहेत. (IND vs ENG 2nd ODI 2021: निर्णायक सामन्यात बेअरस्टो-स्टोक्सचा भारताला दणका, दुसऱ्या वनडेत 6 विकेट विजयाने इंग्लंडची मालिकेत 1-1 बरोबरी)

1. इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जॉनी बेअरस्टोने भारताविरुद्ध दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले. बेअरस्टोच्या वनडे कारकिर्दीतील हे 11 वे शतक ठरले.

2. बेअरस्टोने कुलदीप यादवच्या चेंडूवर षटकार मारत आपले शतक पूर्ण केले. या शतकासह बेअरस्टो इंग्लंडकडून वनडेमध्ये सर्वाधिक शंभरी खेळी करणारा चौथा खेळाडू ठरला आहे. या यादीत जो रूट 16 शतकी खेळीसह पहिल्या स्थानावर आहे.

3. एकदिवसीय क्रिकेटमध्ये जॉनी बेअरस्टोने 11 शतके पूर्ण करण्यासाठी एकूण 78 डाव घेत विराट कोहलीला पिछाडीवर टाकले. एकदिवसीय मालिकेत कोहलीने 82 डावांमध्ये 11 शतके ठोकली होती.

4. इंग्लंडविरुद्ध दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाज केएल राहुलने शानदार शतक ठोकले. राहुलच्या वनडे कारकिर्दीतील हे 5वे, तर इंग्लंडविरुद्ध पहिले शतक आहे.

5. केएल राहुल भारतासाठी एकदिवसीय सामन्यात 1500 धावा पूर्ण करणारा वेगवान भारतीय फलंदाज ठरला आहे. राहुलने कोहलीला मागे ठेवून मानाचे स्थान मिळवले. राहुलने 36 डाव तर विराटने 38 टप्पा सर केला होता.

6. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 वेगवेगळ्या क्रमांकावर खेळत शतक करणारा राहुल 5वा भारतीय खेळाडू बनला आहे. राहुलपूर्वी मोहम्मद अझरुद्दीन, राहुल द्रविड, अजय जडेजा आणि एमएस धोनी यांनी ही कामगिरी केली आहे.

7. इंग्लंडचा लेगस्पिनर राशिद खानने भारतीय कर्णधार विराट कोहलीला 66 वैयक्तिक धावसंख्येवर पॅव्हिलियनचा मार्ग दाखविला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रशीदने विराटला बाद करण्याची ही 9वी वेळ होती. कोहलीला सर्व फॉर्मेटमध्ये सर्वाधिक वेळा बाद करणारा तो पहिला फिरकीपटू ठरला आहे.

8. विराटने आपल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ पछाडले आहे. आफ्रिकेच्या कर्णधाराने 5416 धावा केल्या असून विराट कोहलीने 41 धावा केल्यावर स्मिथला पिछाडीवर टाकले. कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत कोहली आता 5व्या स्थानावर पोहोचला आहे.

9. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करताना कोहलीने 10,000 धावा पूर्ण केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगनंतर कोहली हा दुसरा खेळाडू ठरला.

10. रिषभ पंतने 40 चेंडूत 77 धावांची तुफानी खेळी केली. पंतने या खेळीदरम्यान एकूण 7 षटकार लगावले आणि भारतीय सिक्सर किंग युवराज सिंहचा 13 वर्षांपूर्वीचा  विक्रम मोडला. 2008 मध्ये युवीने इंग्लंडविरुद्ध आपल्या खेळीत 6 षटकार लगावले होते.

11. इंग्लंडविरुद्ध कुलदीप यादवने सर्वाधिक षटकार लुटले. कुलदीप यादवच्या ओव्हरमध्ये इंग्लिश फलंदाजांनी एकूण 8 षटकार लगावले.

12. कृणाल पांड्याच्या एक ओव्हरमध्ये बेन स्टोक्सने सलग तीन षटकार लगावले आणि एकूण 28 धावा लुटल्या.

13. वनडे क्रिकेटमध्ये बेन स्टोक्सने सर्वात जलद 99 धावा ठोकल्या. 2015 वर्ल्ड कप दरम्यान युएईविरुद्ध 82 चेंडूत 99 धावांसहएबी डिव्हिलियर्सच्या यादीत दुसरा सर्वात वेगवान  आहे.

दरम्यान, दोन्ही संघातील मालिकेचा अखेरचा सामना रविवार, 28 मार्च रोजी आयोजित केला जाईल. विशेष म्हणजे यापूर्वी कसोटी आणि टी-20 मालिकेत भारतीय संघाने निर्विवाद वर्चस्व गाजवले होते.