टीम इंडिया (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs ENG 3rd D/N Test: इंग्लंडविरुद्ध (England) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेला तिसरा पिंक-बॉल टेस्ट (Pink-Ball Test) सामना अवघ्या दोन दिवसात संपुष्टात आला. पहिल्या डावात इंग्लंडने 112 धावा केल्या तर यजमान टीम इंडियाने (Team India) 145 धावा करत 33 धवनची आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या डावात देखील इंग्लंडची निराशाजनक फलंदाजी सुरूच राहिली आणि संघाचा 81 धावांत आटोपला आणि भारताला 49 धावांचे आव्हान मिळाले जे रोहित शर्मा आणि शुबमन गिलच्या सलामी जोडीने सहज गाठले. यश भारतीय संघाने मालिकेत 2-1 अशी विजयी आघाडी घेतली. मात्र, दोनच दिवसात कसोटी सामन्यात विजय मिळवण्याची भारतीय संघाची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी, 2018 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध (Afghanistan) खेळला गेलेला सामना देखील दोन संपुष्टात आला होता. आशिया खंडात एकूण तीन वेळा दोन दिवसात कसोटीचा निकाल लागला ज्यात भारतीय संघाने दोन वेळा विजय मिळवला आहे. (IND vs ENG 3rd D/N Test Day 2: अक्षर-अश्विनच्या फिरकीची जादू, पिंक-बॉल टेस्ट सामन्यात टीम इंडियाचा दणदणीत विजय)

2002-03 शारजाहच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचा धुव्वा उडवत सामना जिंकला होता, त्यानंतर 2018 मध्ये बेंगलोर येथे टीम इंडियाने पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळणाऱ्या अफगाणिस्तान संघाचा दोन दिवसात निकाल लावला होता. त्यानंतर, 25 फेब्रुवारी रोजी दुसऱ्यांदा भारताने दोन दिवसात सामन्याचा निकाल लावला आहे. शिवाय, आंतरराष्ट्रीय स्तरावर 1932 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंतचा सर्वात छोटा कसोटी सामना खेळला गेला. मेलबर्न येथे दोन्ही संघात संपूर्ण सामन्यात फक्त 109.2 ओव्हरचा खेळ खेळण्यात आला.

दुसरीकडे, या विजयासह भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रबळ दावेदार बनला आहे. लॉर्ड्स येथे न्यूझीलंड विरुद्ध अंतिम सामन्यात खेळण्यासाठी त्यांना चौथ्या आणि अंतिम टेस्ट सामन्यात विजय किंवा ड्रॉ करणे गरजेचे आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी इंग्लिश फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. अक्षर पटेल आणि अश्विनच्या फिरकीने पाहुण्या संघाचा डाव अवघ्या 112 धावांवर संपुष्टात आणला. पण भारताचा पहिला डावदेखील गडगडला आणि 145 धावांवर संघ ऑलआऊट झाला. पण, अक्षर-अश्विनने पहिल्या डावातील खेळीची पुनरावृत्ती केली आणि इंग्लंडला भारताविरुद्ध सर्वात कमी 81 धावसंख्येवर बाद केले ज्यामुळे यजमान संघाला अखेर 49 धावांचे लक्ष्य मिळाले.