IND vs ENG 2nd Test: Rishabh Pant आणि ईशांत शर्माची फलंदाजी बघून संतापले Virat Kohli व Rohit Sharma, कॅमेऱ्यात कैद झाल्या भावना (Watch Video)
विराट कोहली, रोहित शर्मा (Photo Credit: Twitter)

रविवार, 15 ऑगस्ट रोजी लॉर्ड्सवर (Lords) इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या सामन्यात टीम इंडियाला (Team India) कठीण स्थितीचा सामना करावा लागला. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वातील भारताने इंग्लंडच्या पहिल्या डावातील 27 धावांच्या आघाडीवर मात करून त्याच्यावर डाव नेण्याचे काम सुरू केले. तथापि, पहिले 27/2 आणि लंच ब्रेकपूर्वी त्यांची स्थिती 55/3 अशी झाली. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने शतकी भागीदारी करत संघाला सामन्यात कमबॅक करून दिले, पण अखेरच्या सत्रात तीन विकेट्स गमावल्यामुळे टीम इंडियाने दिवसाखेर 181-6 धावांपर्यंत मजल मारली व 154 धावांची आघाडी घेतली. रिषभ पंत (Rishabh Pant) व इशांत शर्मा (Ishant Sharma) नाबाद खेळत होते. तथापि, कर्णधार विराट आणि त्याचा मर्यादित षटकांचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) दोन फलंदाजांवर संतापले. (IND vs ENG 2nd Test Day 5: लॉर्ड्स टेस्टवर इंग्लंड अष्टपैलूने संघाला दिली चेतावणी, अंतिम दिवशी ‘इतक्या’ धावांचे लक्ष्य गाठणे होईल कठीण)

यामागील कारण म्हणजे त्यांनी पंचांना खराब प्रकाशामुळे खेळ थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. कोहली आणि रोहितचे निराशा आणि गोंधळलेले भाव कॅमेऱ्यात कैद झाले कारण दोघांनी पंत-इशांतला पंचांशी बोलण्याचा आणि ड्रेसिंग रूममध्ये परतण्याचे संकेत दिले. एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये विराट आणि रोहित लॉर्ड्सच्या बाल्कनीत बसून पंत आणि मैदानात उपस्थित असलेल्या इशांतवर राग व्यक्त करताना दिसत आहेत. शेवटच्या सत्राच्या अखेरच्या क्षणांमध्ये खराब प्रकाशामुळे चेंडू पाहणे कठीण होत होते. असे असूनही, पंत आणि इशांत याबाबत पंचांकडे तक्रार करत नव्हते. टीम इंडियाने तोपर्यंत 6 विकेट गमावल्या होत्या आणि अशा स्थितीत विराट आणि रोहितला विकेट्सचे आणखी नुकसान व्हायला नको असे वाटत होते. दरम्यान, परिस्थिती पाहून पंचानी त्वरित दिवसाचा खेळ संपण्याची घोषणा केली आणि भारतीय संघाने सुटकेचा नि:श्वास सोडला.

दुसरीकडे, भारताने चौथा दिवस 181/6 धावसंख्येवर संपवला आणि त्याच्याकडे फक्त 154 धावांची आघाडी आहे. यासोबत आता पाचव्या दिवशी संघाचे यजमान इंग्लंडला दोनशेपार धावांचे टार्गेट देण्याकडे असेल जेणेकरून टीम इंडियाचे गोलंदाज विजयाची संधी निर्माण करू शकतील. भारताच्या दुसऱ्या डावात सलामीवीर केएल राहुल 5 धावा काढून बाद झाला तर रोहित शर्माने 21 धावांचे योगदान दिले. कर्णधार कोहली 20 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.