इंग्लंडचा (England) अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने (Moeen Ali) सांगितले की, लॉर्ड्स कसोटी (Lords Test) सामन्याच्या पाचव्या दिवशी 220 पेक्षा जास्त काहीही लक्ष्य सोपे असू शकत नाही आणि भारताविरुद्ध (India) धावांचा पाठलाग करताना त्याचा संघ केवळ कर्णधार जो रूटवर (Joe Root) अवलंबून राहू शकत नाही. सध्या टीम इंडियाकडे दुसऱ्या डावात 154 धावांची आघाडी आहे. ऑफ स्पिनिंग अष्टपैलूने अजिंक्य रहाणे (61) आणि रवींद्र जडेजा (3) यांना बाद केले. यापूर्वी दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी 20 धावांवर तीन विकेट्स गमावल्या तर दिवसाचा खेळ तेव्हा 181/6 धावसंख्येपर्यंत मजल मारली. “मला वाटते दोन्ही संघ चांगल्या स्थितीत आहेत, हा क्रिकेटचा एक विलक्षण खेळ आहे. मला वाटतं 220-230 पेक्षा जास्त काहीही कठीण असणार आहे, पण स्पष्टपणे अशक्य नाही. हे सोपे होणार नाही,” अलीने म्हटले. (IND vs ENG 2nd Test: चेतेश्वर पुजाराची विकेट इंग्लंड संघासाठी बनली आनंद आणि टेन्शनचे कारण, जाणून घ्या का)
“आम्ही फक्त रुटवर अवलंबून राहू शकत नाही," बीबीसी स्पोर्टला मोईनने सांगितले. "मी इतर प्रत्येकाइतकीच जबाबदारी घेण्याचा प्रयत्न करेन.” 2012 नंतर लॉर्ड्सवर इंग्लंडला चौथ्या डावातील सर्वाधिक यशस्वी आव्हानाचा सामना करावा लागत आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रिषभ पंत 14 धावांवर नाबाद होता, आणि त्याची उपस्थिती यजमान ब्रिटिश संघासाठी मोठी चिंता बनेल, परंतु अली म्हणाला की तो नवीन चेंडूने परत फटके मारू पाहतील. “आम्हाला माहित आहे की पंत काय करू शकतो, तो किती धोकादायक असू शकतो. पण आपल्या सर्वांना उद्या चांगला खेळ करावा लागेल. नवीन चेंडू निर्णायक ठरेल. आमच्याकडे जिमी अँडरसनही आहे.” या स्फोटक फलंदाजाच्या उपस्थितीबद्दल इंग्लंड संघ नक्कीच चिंतेत असेल. पण मोईन अली म्हणाला की सामन्याच्या 5 व्या दिवशी संघ नवीन चेंडूने मैदानात उतरेल आणि भारतावर दबाव वाढण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल.
दरम्यान, अली दोन वर्षांत केवळ दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात परतला. “मी यापुढे गोष्टींना फार गांभीर्याने घेत नाही. मला माहित आहे की वाईट दिवस असतील आणि चांगले दिवस येतील,” अली म्हणाला, जो 2019 अॅशेसनंतर घरच्या मातीवर पहिली कसोटी खेळत आहे. “मी खरोखरच माझा आनंद घेत आहे. हे माझे ध्येय खरोखर होते. मला फक्त मालिकेचा भाग व्हायचे होते आणि चांगले काम करायचे होते. आशा आहे की मला अधिक धावा मिळतील,” तो म्हणाला.